बस दरीत कोसळली; ३३ पैकी ३२ प्रवाशी ठार

0

रत्नागिरी : दापोली येथून महाबळेश्वरला निघालेल्या मिनीबसला आंबेनळी घाटात भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत बसमध्ये ३३ प्रवासीय होते. बसमधील ३३ पैकी ३२ प्रवाश्याचा मृत्यू या अपघातात झाला आहे. केवळ एका प्रवाशाला वाचवण्यात यश आले आहे. आत्तापर्यंत चार मृतदेह बाहेर काढण्यात यश आले आहे. हे सर्व जण कोकण कृषी विद्यापीठाचे कर्मचारी होते.

चालकाचं नियंत्रण सुटून बस २५० ते ३०० फूट दरीत कोसळली. पोलादपूर पासून साधारण २२ किलोमीटर अंतरावर असलेल्या दाभिळ गावच्या हद्दीत हा अपघात झाला आहे. पोलीस यंत्रणा , तसेच महाबळेश्वर आणि रायगडमधून ट्रेकर्स मदतीसाठी घटनास्थळी पोहोचले आहेत. महाडचे प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार हे देखील घटनास्थळी पोहोचले आहेत. पुण्यातून एनडीआरएफचं एक पथक तातडीनं घटनास्थळाकडे रवाना करण्यात आले आहे.

घाटात दाट धुके असल्याने मदत कार्यात अडथळे येत आहेत. आंबेनळी घाट हा अतिशय धोकादायक आहे वेडीवाकडी वळणे असल्याने अनेकदा या भागात अपघात होत असतात.