Sunday , March 18 2018

अग्रलेख

राहुल गांधींची परीक्षा!

काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी काँग्रेस पक्षाच्या 84 व्या राष्ट्रीय अधिवेशनाचे समारोपाचे भाषण केले. त्यात त्यांनी देशभरातून जमलेल्या हजारो पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्यासमोर लोकसभा निवडणूक 2019मधील प्रचाराचा नारळ फोडला असता, तर चांगले झाले असते. मात्र, तसे झाले नाही. राहुल गांधी यांनी पक्षबांधणीचाच मुद्दा मांडून त्यांनी त्यांच्यासाठीच मोठे शिवधनुष्य …

अधिक वाचा

स्टिफन हॉकिंग एक गूढ

कुणीही मोठी व्यक्ती गेली की अनेकजण म्हणतात, अमुकतमुक क्षेत्रात कधीही भरून न येणारी पोकळी निर्माण झाली, तर कुणी म्हणतात, या क्षेत्राचे प्रचंड नुकसान झाले. काही दिवसांनंतर काळाच्या पडद्याआड गेलेल्या त्या व्यक्तीला सारेजण विसरून जातात. त्यानंतर कुणी साधी आठवणही काढत नाहीत. विश्‍वउत्पत्ती शास्त्र, सामान्य सापेक्षता आणि गुरुत्व अशा विषयांचे गूढ उकलणारे …

अधिक वाचा

लाँग मार्च चिरायु होवो!

नाशिक ते मुंबई असा निघालेल्या लाँग मार्चने चीनमधील माओच्या ऑक्टोबर 1935 मधील लाँग मार्चची आठवण झाली. तो लाँग मार्च माओच्या नेतृत्वात चीनमधील सळसळत्या तरुणाईने काढला होता. याच तरुणाईने पुढे राजकीय सत्ता हस्तगत केली. आणि, विकासाचे आपले स्वप्न साकार केले. आज चीन ही जगातील दुसरी महासत्ता म्हणून पुढे आला आहे. कालचा …

अधिक वाचा

पोशिंद्याची ससेहोलपट!

भाजपच्या खासदार पूनम महाजन यांना मुंबईवर धडकलेल्या शेतकर्‍यांच्या मोर्चातील मायभगिनींच्या पायातील भळभळणारे लाल रक्त दिसले नाही, तर त्यांना त्यांनी हातामध्ये घेतलेला लाल बावटा दिसला आणि त्यांनी एका क्षणाचा विलंब न लावता, हा शहरी नक्षलवाद असल्याची शंका उपस्थित केली. हे अक्षरश: धक्कादायक होते. संयुक्त महाराष्ट्राच्या व खास करून मुंबईच्या लढ्यात हेच …

अधिक वाचा

मनसेचे बारावे!

नुकताच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा 12 वा वर्धापन दिन साजरा झाला. एका झटक्यात मराठीच्या मुद्द्यावर राज्यभर वादळ निर्माण करून विधानसभेवर 13 आमदार निवडून पाठवण्याचा करिष्मा राज ठाकरे यांनी करून दाखवला होता. परंतु, 2014ला मोदी लाट आल्यावर अनेक पक्षांची पडझड झाली. त्यात राज ठाकरेंचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्षही सुटला नाही. राज …

अधिक वाचा

भारतरत्न सावित्रीबाई!

स्त्री शिकली आणि प्रगत झाली. आज विविध क्षेत्रांत महिला अतिशय आत्मविश्‍वासाने वावरत आहेत. आपापल्या क्षेत्रात त्यांनी नालौकिक प्राप्त केला आहे. असे एकही क्षेत्र आज नाही, ज्यामध्ये महिलांचा समावेश नाही. कालपरवाच भारतीय वायूसेनेतील पायलट अवनी चतुर्वेदी या 28 वर्षांच्या मुलीने मिग-21 हे लढावू विमान एकटीने चालवून इतिहासात स्वत:च्या नावाची नोंद केली …

अधिक वाचा

लेनिन या झुंडांना क्षमा करा!

ज्यांना व्लादिमीर लेनिन यांचे विचार, कार्य आणि जगाला असलेली त्यांच्या विचारांची गरज माहीत नाही, अशा झुंडांनी त्रिपुरातील विजयानंतर त्यांच्या पुतळ्यावर बुलडोझर फिरवला. पुतळे उखडले म्हणजे त्या महापुरुषांचे कार्य आणि विचार नेस्तनाबूत होतात, असे मानणार्‍या अल्पमतीच्या या झुंडांचा हा उपद्व्याप देश कदापिही सहन करणार नाही. मुळात एखाद्या महात्म्याला शांती आणि अहिंसेचा …

अधिक वाचा

दहशत उद्ध्वस्त!

त्रिपुरा विधानसभेच्या निवडणुकीत भाजपने विजयाला गवसणी घालत गेली 2 दशके सत्तेत असलेला माणिक सरकारचा अर्थात डाव्यांचा गड जमीनदोस्त केला. गेल्या 35 वर्षांमध्ये भाजपला त्रिपुरा राज्यात प्रथमच स्पष्ट बहुमत प्राप्त झाले. त्रिपुरा, नागालॅन्ड आणि मेघालय या 3 राज्यांत झालेल्या विधानसभेच्या निवडणुकांचे निकाल अनपेक्षित लागले असून, यात काँग्रेस आणि डाव्यांची पीछेहाट झाली …

अधिक वाचा

शोध गरिबीचा!

भारतासारख्या विकसनशील देशात प्रचंड विषम परिस्थिती आहे. काही लोकांना आज काय खावे असा प्रश्‍न पडलेला असतो, तर काहींना आज काय काय खावे? असा प्रश्‍न पडलेला असतो. रोजच्या पोटापाण्याच्या समस्येला तोंड देणार्‍यांची संख्या भारतात 80 टक्क्यांपेक्षा जास्त आहे. सध्या याच गरिबीवर केंद्र सरकारचे संशोधन सुरू आहे. गरिबीची व्याख्या काय करायची यावरच …

अधिक वाचा

‘चांदणी’ का निखळली!

श्रीदेवीच्या आकस्मिक निधनाने धक्का बसला नाही, असा एकही भारतीय शोधून सापडणार नाही. ती एक मदमस्त अदाकारा होती, सौंदर्यवती होती, चतुरस्त्र अभिनेत्री होती. गडदलेल्या निशेला ज्याप्रमाणे एखादी चांदणी आपल्या तेजाळलेल्या सौंदर्याने मनाला भुरळ घालते, त्याप्रमाणे भुरळ घालणारी ती एक नायिका होती. आपल्यासह अनेक पिढ्या तिच्या सौंदर्यावर भाळल्या, तिच्या कलेवर फिदा झाल्या …

अधिक वाचा