Sunday , March 18 2018

अर्थ

भारताची जीएसटी करप्रणाली सर्वात किचकट : वर्ल्ड बँकेचा अहवाल!

भारतीय जीएसटीची जगातील 115 देशांची केली तुलना रिफंड रखडल्याने उद्योगांच्या अर्थकारणावर दुष्परिणाम नवी दिल्ली : वस्तू व सेवाकर (जीएसटी) करप्रणालीवर विरोधकांनी टीकेची झोड उठवलेली असतानाच, आता जागतिक बँकेनेही (वर्ल्ड बँक) जीएसटी प्रणालीवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले आहेत. भारतात लागू करण्यात आलेली जीएसटी करप्रणाली सर्वात किचकट करप्रणाली असल्याचे मत जागतिक बँकेने व्यक्त …

अधिक वाचा

राज्यात 15 हजार कोटींची तुट

मुंबई । राज्याचा सन 2018-19 चा अर्थसंकल्प अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार शुक्रवारी विधानसभेत सादर केला. राज्याच्या तिजोरीत 2 लाख 85 हजार 968 कोटी रूपयांचा महसूल जमा झाला असून 3 लाख 1 हजार 343 कोटींंचा महसूली खर्च झाला आहे. त्यामुळे राज्याचा 2018-19 चा अर्थसंकल्प 15 हजार 385 कोटी रूपयांच्या महसुली तुटीचा अर्थसंकल्प …

अधिक वाचा

अर्थसंकल्पाचे रटाळ प्रस्तुतीकरण, विरोधक चिडीचूप!

शांततेच्या वातावरणात सादर केला अर्थसंकल्प मुंबई (निलेश झालटे) :- सरकारच्या वतीने शुक्रवारी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत अर्थसंकल्प सादर केला. मात्र गेल्यावर्षी विरोधकांचा अभूतपूर्व गोंधळ सुरु असतानाही ज्या ताकतीने त्यांनी अर्थसंकल्प सादर केला होता तो उत्साह यावेळी दिसून आला नाही. तर दुसरीकडे गेल्यावर्षी शेतकरी कर्जमाफीसाठी अर्थसंकल्पादरम्यान अभूतपूर्व गोंधळ घालणारे विरोधकही …

अधिक वाचा

LIVE : महाराष्ट्राचा अर्थसंकल्प

छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने बजेटची सुरुवात – सामान्यांच्या जगण्यात आनंदाचे क्षण आणणारा अर्थसंकल्प असेल – जनतेचा आशीर्वाद – 1224 दिवस, 29,376 तास आम्हाला संधी दिलीय – सेवा का प्रण दिल में है, – स्मारकाचे जलपूजन केले होते, निविदा आईम केली. 36 महिन्यात प्रकल्प उरण करणार.300 कोटींची तरतूद, आवश्यकतेनुसार निधी दिला …

अधिक वाचा

कृषी क्षेत्रात विकास दर ढेपाळला!

गेल्यावर्षीच्या २२.५ टक्क्यांवरुन यंदा उणे ८.३ टक्क्यांवर राज्याच्या आर्थिक पाहणी अहवालातून विकासाची सत्य परिस्थिती समोर मुंबई (निलेश झालटे): अच्छे दिन आणि विकासाच्या जाहिराती दाखवून भलामोठा विकास केल्याचा दावा करणाऱ्या सरकारच्या ‘विकासाची’ पोलखोल राज्याच्या आर्थिक पाहणी अहवालातून झाली आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत राज्याच्या विकासदरातील घटीसोबतच कृषी आणि संलग्न क्षेत्रातही लक्षणीय घट …

अधिक वाचा

राज्यात इलेक्ट्रिक उद्योगांसाठी मोठी संधी

मुंबई । देशाने वाहनांसाठी पर्यायी इंधनाचा वापर करण्यासाठी प्रोत्साहन देण्याचे धोरण स्वीकारले असून, यासाठी महाराष्ट्राने इलेक्ट्रिक वाहन धोरण लागू केल्याने राज्यात उद्योगांसाठी मोठी संधी निर्माण झाली आहे, असे मत ’इमरजिंग टेक्नॉलॉजी इन सेक्टर्स’ या चर्चा सत्रात सहभागी मान्यवरांनी व्यक्त केले. बीकेसी येथे एमएमआरडीए मैदानावरील मॅग्नेटिक महाराष्ट्र कॅन्व्हर्जन्स 2018 या आंतरराष्ट्रीय …

अधिक वाचा

बँक शेअर्सची मोठी घसरण, 70 हजार कोटींची होळी

बँकेक्स तब्बल 600 अंकांनी घसरला मुंबई : पंजाब नॅशनल बँकेच्या घोटाळ्याने बँकिंग क्षेत्राचे धाबे दणाणले आहे. या घोटाळ्यामुळे बँकांच्या शेअर्सची मोठ्याप्रमाणात घसरण झाली आहे. पीएनबी घोटाळा 11,400 कोटी रुपयांचा असल्याचा अंदाज सध्या व्यक्त होत असला तरी या घोटाळ्यानंतर शेअर बाजारात बँकांच्या शेअर्सच्या विक्रीचा जो तडाखा बसला त्यात 67,800 कोटी रुपयांची …

अधिक वाचा

पीएनबी घोटाळा 30,000 कोटींचा!

मोदीचा 17 बँकांना 3000 कोटींचा चुना नवी दिल्ली : पंजाब नॅशनल बँक (पीएनबी) घोटाळा हा तब्बल 30 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेचा असल्याचा घणाघाती आरोप काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी केला आहे. नीरव मोदी व मेहुल चोकशी यांना दिलेल्या लेटर ऑफ अंडरस्टॅण्डिंगमुळे पीएनबीचे केवळ 11400 कोटी रुपयांचेच नुकसान झाले नाही …

अधिक वाचा

5235 कोटींचा अर्थसंकल्प सादर!

पिंपरी-चिंचवड महापालिकेचा अर्थसंकल्प स्थायी समितीला सादर पिंपरी-चिंचवड : आशियातील सर्वात ’श्रीमंत’ पिंपरी-चिंचवड महापालिकेचा सन 2018-19 या आर्थिक वर्षाचा मूळ 3500 कोटी तर जेएनएनयूआरएमसह 5235 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डिकर यांनी गुरुवारी स्थायी समितीला सादर केला. 181 कोटी रुपये शिलकीच्या या अंदाजपत्रकात अनावश्यक कामे टाळून, सुरु आहे त्याच …

अधिक वाचा

पंजाब नॅशनल बँकेत 11,330 कोटींचा घोटाळा

शेअर 8 टक्क्यांनी घसरले, गुंतवणूकदारांना 3000 कोटींना चुना मुंबई : देशातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी व दुसर्‍या क्रमांकाची बँक असलेल्या पंजाब नॅशनल बँक (पीएनबी)मध्ये तब्बल 1.77 अब्ज डॉलर्सचा म्हणजेच सुमारे 11 हजार 330 कोटी रुपयांचा घोटाळा झाला असल्याचे पुढे आले आहे. ही रक्कम मुंबईतील एका शाखेतून झालेल्या अनधिकृत व्यवहारांशी संबंधित …

अधिक वाचा