Sunday , March 18 2018

महामुंबई

आदई तलावाला न्याय कधी?

नवी मुंबई । रहिवाशांना क्षणभर विश्रांती त्याचबरोबर विरंगुळ्याकरिता आदई तलाव परिसर महत्वाचे ठिकाणी आहे. स्थानिक रहिवाशांना निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालवायचा असेल तर हे ठिकाण उत्तम आहे. या ठिकाणी गणपतींचे विसर्जन त्याचबरोबर छट पूजा होत असल्याने या जलाशयाला अधिक महत्त्व प्राप्त आहे. वास्तविक पाहता तलावाची साफसफाई आणि देखभाल करण्याची जबाबदारी सिडकोची …

अधिक वाचा

महाडचे चवदार तळे अतिक्रमणाच्या विळख्यात

महाड । सगळीकडे अतिक्रमणाचा विळखा वाढत असताना ऐतिहासिक स्थळे आता वाहनांच्या अतिक्रमणाच्या विळख्यात सापडत चालली आहेत. याकडे प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे येणार्‍या पर्यटकांना देखील त्रासाचा सामना करावा लागत असल्याचे चित्र आहे. रायगड जिल्ह्यातील महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी संपुर्ण मानव जातीला समतेचा संदेश दिला,दि.20 मार्च 1927 रोजी चवदार तळे सत्याग्रह करुन सामाजिक क्रांतिची …

अधिक वाचा

यशासाठी कोणताही शॉटकट नसतो

मनोर । यश मिळवण्यासाठी कोणताही शॉटकट नसतो. कोणत्याही क्षेत्रात मेहनतीशिवाय यश मिळवण्याचा कोणताही पर्याय नसतो. फोटोग्राफी क्षेत्रालाही हाच नियम लागू आहे. एका झटक्यात कुणीही उत्कृष्ट फोटोग्राफर होऊ शकत नाही, असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय पुरस्कार विजेते प्रख्यात छायाचित्रकार निर्भय पाटील यांनी सोनोपंत दांडेकर महाविद्यालयात संपन्न झालेल्या दोन दिवसीय फोटोग्राफी कार्यशाळेत केले. या …

अधिक वाचा

पर्यटक बनून बनावट नोटा वटवणार्‍या बंगालच्या तरुणाला पकडले!

उरण । दोन हजार रुपयांच्या बनावट नोटा वटविणार्‍या एका भामट्याला मोरा पोलिसांनी अटक केली. उरण तालुक्यातील घारापुरी येथे या भामट्याला पकडण्यात आले असून, पोलिसांनी त्याच्याकडून 2 हजार रुपयांच्या 9 नोटा हस्तगत करण्यात आल्या आहेत. अब्दुल जब्बार (25) असे या आरोपीचे नाव असून, तो पश्‍चिम बंगाल येथील रहिवासी आहे. घारापुरी येथे …

अधिक वाचा

रायगड जिल्हापरिषदेचा विद्यार्थी वाढीसाठी अभिनव उपक्रम

रायगड । खासगी शाळांमध्ये विद्यार्थ्यांचा वाढता ओढा लक्षात घेऊन राज्यामध्ये विविध जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये देखील अभिनव योजनांद्वारे विद्यार्थ्यांना आकर्षित केले जात आहे. याच पार्श्‍वभूमीवर जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांची पटसंख्या काही वर्षांपासून कमी होत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक शाळा पटसंख्याअभावी बंद करण्यात आल्या आहेत. जिल्हापरिषद शाळेमधील गळती थांबवण्यासाठी आता जिल्हापरिषद अध्यक्षा …

अधिक वाचा

पालघरमध्ये इंजिनीअर, डॉक्टरांना व्हायचंय पोलीस शिपाई!

पालघर (सुमित पाटील) । पालघर जिल्ह्यातील 160 पोलीस शिपाई जागांसाठी तब्बल 19 हजार 560 उमेदवारांनी अर्ज भरले असून त्यापैकी 98 उमेदवार उच्च विभूषित असल्याची माहिती मिळाली आहे. पालघर येथील कोळगाव पोलीस परेड मैदानावर सध्या पोलीस भरती प्रक्रियेतील शारीरिक चाचणी स्पर्धा सुरू असून दररोज 1500 ते 2500 उमेदवार सहभागी होणार आहेत. …

अधिक वाचा

अवयवदानाच्या जनजागृतीसाठी 50 फुटी गुढी

ठाणे । मराठी नववर्षाचे स्वागत पहाटे मोठ्या थाटामाटात ठाण्यातील जांभळी नाका येथे साजरे करण्यात आले. या हिंदू नववर्ष स्वागतासाठी ठाण्यातील विविध सामाजिक आणि धार्मिक संस्थांनी सहभाग घेतला. यावेळी अवयवदानाविषयी जनजागृतीसाठी 50 फुटी गुढी उभारण्यात आली. यामध्ये नेत्रदान, हृदयदान, यकृतदान अशा प्रकारचे फलक लावून जनजागृती करण्यात आली होती. शिवसेना शहर उपप्रमुख …

अधिक वाचा

संभाव्य कृती आराखड्यात तब्बल 268 गावपाडे टंचाईग्रस्त

शहापूर । भातसा, तानसा, मोडकसागर तसेच मध्यवैतरणा धरणाचे अथांग पसरलेले पाणी शहापूर तालुकावासीयांच्या डोळ्यांना दिसतंय पण प्यायला मिळत नाही अशी दुर्दम्य अवस्था झालेल्या तालुक्याच्या दुर्गम भागातील पाणीटंचाई महिला भागिनींच्या अक्षरशः पाचवीलाच पुजली आहे. यावर्षीही रणरणत्या उन्हात रानोमाळ भटकून पिण्याच्या पाण्यासाठी चटके खावे लागणार आहेत. पाणीटंचाईने ग्रासलेल्या शहापूर तालुक्यातील गावपाडयांच्या संख्येत …

अधिक वाचा

नवाजुद्दीनला वाचवण्यासाठी रिजवानचा बळी

ठाणे । ठाणे पोलिसांनी नवाजुद्दीन सिद्दीकी आणि त्याच्या भावाला वाचवण्यासाठी वकील रिजवान सिद्दीकीला बळीचा बकरा बनवल्याचा आरोप सिद्दीकी यांचे वकील रिजवान मर्चंट यांनी केला. ठाणे पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारीही या दोघांना वाचवण्यासाठी खाटाटोप करत आहेत. नवाजुद्दीन सिद्दीकीचा वकील रिजवान सिद्दीकी याला अटक करण्यात आली होती. ठाणे पोलिसांनी ही कारवाई केली …

अधिक वाचा

यंदा अशोका धबधबा पर्यटकांसाठी सोयी-सुविधांनी सज्ज

शहापूर । पावसाळा सुरू होताच मुंबई, ठाणे, नाशिक भागातील पर्यटक शहापूर विधानसभा क्षेत्रातील कसारा – विहिगावनजीक असलेला सुप्रसिद्ध अशोका धबधबा येथे पावसाचा आनंद घेण्यासाठी येतात. मात्र या ठिकाणी सोयी सुविधांचा अभाव होता. याबाबत आमदार पांडुरंग बरोरा यांच्या प्रयत्नांने 32 लाखांचा निधी मंजूर झाला आणि विकासकामे वेगाने होत आहेत. त्यामुळे यंदाचा …

अधिक वाचा