Sunday , March 18 2018

मुंबई

मी नरेंद्र मोदींची मोठी फॅन : कंगना

मुंबई : अभिनेत्री कंगना राणौत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या यशस्वी राजकीय करियरने प्रभावित झाली आहे. मी पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी फॅन आहे. एक चहावाला देशाचा पंतप्रधान आहे. अर्थात हा त्यांचा नाही तर देशाच्या लोकशाहीचा विजय आहे. जग कधीच परफेक्ट असू शकत नाही. पण आपण त्यांना बॅलेन्स करू शकतो, असे कंगनाने …

अधिक वाचा

शिक्षणमंत्र्यांच्या घराजवळ उभारली काळी गुढी

शिक्षकांचे वेतन रखडल्याचा निषेध नोंदवला मुंबई : मुंबईतील 27 हजार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांचे वेतन रखवडणार्‍या शिक्षण विभागाचा निषेध करण्यासाठी रविवारी सकाळी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या बंगल्यात घुसून काळी गुढी उभारली. शिक्षक परिषदेचे अनिल बोरनारे यांनी शिक्षणमंत्र्यांच्या बंगल्यात घुसून ही गुढी उभारली. शिक्षक परिषद मुंबई विभागाचे …

अधिक वाचा

रस्त्यावर दहावी-बारावीच्या कोर्‍या उत्तरपत्रिकांचा खच

पोलिसांनी उत्तरपत्रिका ताब्यात घेतल्या मुंबई : दहावी-बारावीच्या परीक्षा सुरु असताना मुंबईतील पूर्व द्रुतगती मार्गावर कोर्‍या उत्तरपत्रिकांचा खच सापडला आहे. मुंबईतील विक्रोळी गोदरेज सिग्नलजवळ या उत्तरपत्रिका पडलेल्या होत्या. सध्या दहावीच्या बोर्डाच्या परीक्षा सुरु आहेत. या परीक्षाकाळात पेपरफुटीच्या घटना राज्याच्या विविध भागातून समोर येत आहेत. पण आता कोर्‍या उत्तरपत्रिकांचा खच मुंबईतल्या मुख्य …

अधिक वाचा

राज-पवारांमध्ये पाऊणतास गुप्तगू

राजकीय समीकरणे बदलणार? राजकीय चर्चा नाही : राज ठाकरे मुंबई : सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या विरोधकांची मोट बांधण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी हालचाली सुरू केल्या असतानाच, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शनिवारी सकाळी पवारांच्या पेडर रोडवरील निवासस्थानी पोहोचून त्यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांनी बंददाराआड सुमारे पाऊणतास …

अधिक वाचा

बचतगटांच्या साहाय्याने सेंद्रीय उत्पादनाला प्रोत्साहन

मुंबई । सेंद्रीय अन्नाची उपलब्धता आणि सेंद्रीय शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासन व्यापक प्रयत्न करत आहे. केंद्रीय महिला – बालविकास विभाग आणि महाराष्ट्र आर्थिक विकास महामंडळामार्फत आयोजित सेंद्रीय उत्पादनांच्या प्रदर्शनातून या चळवळीला निश्‍चितच नवी दिशा आणि गती मिळेल, असे राज्याच्या महिला – बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी आज येथे सांगितले. …

अधिक वाचा

एमपीएससी प्रक्रियेवरील उच्च न्यायालयाची स्थगिती ‘मॅट’कडूनही कायम

मुंबई । एमपीएससी प्रक्रियेवर मुंबई उच्च न्यायालयाने लावलेली स्थगिती शुक्रवारी महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणानेही (मॅट) कायम ठेवली. उच्च न्यायालयाच्या एका आदेशाप्रमाणे केवळ आरटीओशी संबंधित निकाल जारी करण्याची मुभा ‘मॅट’ला देण्यात आली. या संदर्भात दाखल करण्यात आलेली जनहित याचिका निकाली काढताना हे प्रकरण मॅटकडे नेण्याचे निर्देश हायकोर्टाने दिले होते. एमपीएससीच्या समांतर आरक्षणासंदर्भात …

अधिक वाचा

दमबाजी करणारा अन्न व औषध प्रशासनाचा अधिकारी निलंबित

मुंबई । राज्यात गुटखाबंदी असतानाही सर्वत्र सर्रास गुटखा विक्री सुरू असल्याने याबाबत विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी लक्षवेधी उपस्थित केली. मात्र, गुटखाबंदीची लक्षवेधी का उपस्थित केली म्हणून अन्न व औषध प्रशासनाचा अधिकारी आर. डी. आकरूपे या अधिकार्‍याने उदगीरचे भाजपा आमदार सुधाकर भालेराव यांच्यासोबत विधान भवनाच्या कार्यालयात येऊन माझ्या …

अधिक वाचा

पदोन्नती आरक्षणासाठी मागासवर्गीय संघटनेचा मोर्चा

मुंबई । सरकारने न्यायालयाला एससी, एसटी, डीटी, एनटी, ओबीसी, एसबीसीच्या पदोन्नतीतील आरक्षणाची ठोस संख्यात्मक आकडेवारी द्यावी. तामीळनाडू राज्याप्रमाणे महाराष्ट्र राज्याच्या आरक्षण कायद्या घटनेचा परिशिष्ट – 9, मध्ये समावेश करावा, मागासवर्गीय प्रवर्गाच्या पदोन्नतीतील आरक्षणासाठी घटनात्मक तरतूद करावी आदी प्रमुख मागण्यांसाठी ऑल इंडिया बॅकवर्ड क्लासेस एम्पोलॉइस फेडरेशनच्या वतीने आरक्षण आमच्या हक्काचे; नाही …

अधिक वाचा

नवे वस्त्रोद्योग धोरण रोजगाराला पोषक

मुंबई । राज्याचे नवीन वस्त्रोद्योग धोरण 2018 ते 2023 जाहीर करण्यात आले आहे. हे धोरण राज्यातील वस्त्रोद्योग धोरणाला आणि रोजगाराला नव्याने चालना देणार आहे. यात येत्या पाच वर्षात दहा लाख रोजगारनिर्मिती तसेच 2022 पर्यंत राज्यातील शेतकर्‍यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले असल्याचे वस्त्रोद्योग राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी विधानपरिषदेत लक्षवेधीला …

अधिक वाचा

26 पंतप्रधान सिंचन प्रकल्प डिसेंबर 2019 पर्यंत पूर्ण

मुंबई । राज्यातील जलगतीने होणार्‍या पूर्ण 26 प्रकल्पांचा पंतप्रधान सिंचन प्रकल्प योजनेत समावेश करण्यात आला आहे. या प्रकल्पांसाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला असून डिसेंबर 2019 ही हे प्रकल्प पूर्ण करून कार्यान्वित केले जाणार आहे. अशी माहिती जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी विधानसभेत दिली. कोल्हापूर जिल्हयातील प्रकल्पांची कामे अपूर्णावस्थेत असल्याबद्दल …

अधिक वाचा