Sunday , March 18 2018

पिंपरी-चिंचवड

आकर्षक शोभायात्रांनी गुढीपाडवा सजला

ढोलताशांचा दणदणाट, लेझीमचं शिस्तबद्ध संचलन, पारंपारिक पोशाखात नटलेल्या मंडळींचा सहभाग घराघरांवर उभारल्या गुढ्या : वाहनांपासून संसारोपयोगी साहित्याची खरेदी : कोट्यवधींची उलाढाल पिंपरी-चिंचवड : ढोलताशांचा दणदणाट, लेझीमचं शिस्तबद्ध संचलन, पारंपारिक पोशाखात नटलेली मंडळी…सुवासिनींनी काढलेला ‘बुलेट मार्च’, तलवारबाजी, दांडपट्टा, रांगोळ्यांची आरास, हातात भगवा झेंडा घेऊन निघालेल्या मिरवणुका आणि ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या …

अधिक वाचा

पदवी म्हणजे नवीन करण्याची क्षमता प्राप्त झाल्याचे प्रमाणपत्र : डॉ. सुभाष आवळे

साडेसहाशे पदवीधरांनी घेतले पदवी प्रमाणपत्र आकुर्डी : जीवनात ध्येय निश्‍चित करण्याचा अंतिम टप्पा म्हणजे पदवी प्रदान समारंभ होय. पदवी मिळणे म्हणजे काही नवीन करण्याची क्षमता, योग्यता प्राप्त झाल्याचे प्रमाणपत्र, ती क्षमता, योग्यता आपल्यात रुजवण्याचे, निर्माण करण्याचे काम महाविद्यालय करीत असते. अभियंत्यांच्या सर्वांगिण विकासामध्ये महाविद्यालयांचे योगदान मोलाचे असते, असे प्रतिपादन डॉ. …

अधिक वाचा

‘मी पिंपरी-चिंचवडकर’ हे अभिमानाने सांगता आले पाहिजे : हर्डीकर

रोटरी क्लबतर्फे आयोजित कार्यक्रमात व्यक्त केले मत पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहर पुण्यापेक्षा अधिक आधुनिक आहे. या शहरात अनेक सोयी-सुविधा आहेत. असे असतानाही ‘मी पिंपरी-चिंचवडकर आहे’ असे सांगण्यासाठी येथील नागरिकांना संकोच वाटता कामा नये. आपले शहर सर्वच बाबतीत आधुनिक आहे. त्यामुळे येथील प्रत्येक नागरिकाला आपल्या शहराचा अभिमान वाटला पाहिजे, असे मत …

अधिक वाचा

आमदार लक्ष्मण जगताप यांच्या मदतीमुळे जीवावरच्या संकटातून गुरख्याची मुक्ती

मोफत शस्त्रक्रियेमुळे वाचले गुरख्याचे प्राण कार्यालयात संपर्क साधण्याचे आमदार जगतापांचे आवाहन पिंपरी : भाजप शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांनी केलेल्या मदतीमुळे हृदयाचा आजार झालेल्या अवघ्या 19 वर्षे वयाच्या एका नेपाळी गुरख्यावर मोफत हृदय शस्त्रक्रिया करण्यात आली. या शस्त्रक्रियेसाठी खासगी रुग्णालयाने त्याला तब्बल साडेचार लाखांचा खर्च सांगितला होता. परंतु, आमदार …

अधिक वाचा

थरमॅक्समध्ये केशवराव घोळवे पॅनलचे निर्विवाद वर्चस्व

फटाक्यांची आतषबाजी, पेढे वाटून आनंद साजरा पिंपरी : मुंबई उच्च न्यायालयाच्या अंतरिम आदेशानुसार गुरुवारी थरमॅक्स ली. चिंचवड येथे थरमॅक्स कामगार संघटनेची त्रैवार्षिक निवडणूक मतदानाद्वारे संपन्न झाली. या निवडणुकीकडे जिल्ह्यातील दिग्गजांचे लक्ष लागले होते. या निवडणुकीमध्ये केशव घोळवे यांच्या मार्गदर्शनाखालील पॅनल एकमताने निवडून आला. विजयी उमेदवार व त्यांना मिळालेली मते पुढीलप्रमाणे …

अधिक वाचा

जुन्या भांडणातून टोळक्याची तिघांना मारहाण

हिंजवडी – दहा जणांच्या टोळक्याने जुन्या भांडणाच्या रागातून तिघांना लाकडी दांडक्याने, लाथा-बुक्यांनी जबर मारहाण केली. ही घटना शुक्रवारी दुपारी भोईरवाडी येथे घडली. याप्रकरणी गणेश गोडांबे (वय 25, रा. घोटावडे, मुळशी) याने हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार निखील मारणे, लतेश मारणे, समीर मारणे (तिघेही रा. उरावडे), नवनाथ सुभाष भोईर, …

अधिक वाचा

पूर्ववैमनस्यातून रिक्षा चालकावर कोयत्याने वार

दिघी : ‘तुला जिवंत सोडणार नाही’ असे म्हणत शिवीगाळ करत सहा जणांच्या टोळक्याने रिक्षा चालकाच्या मानेवर, हातावर कोयत्याने वार केले. तसेच लाकडी स्टंप, दगडाने जबर मारहाण केली. ही घटना गुरूवारी दिघीतील साई पार्क जवळ सायंकाळी साडेसात वाजता घडली. याप्रकरणी दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. शुभम खंदारे (वय 19, रा. …

अधिक वाचा

शासनाच्या प्लास्टिक बंदीची कठोर अंमलबजावणी गरजेची

राष्ट्रवादी शहर उपाध्यक्ष अमित बच्छाव यांचे मत पिंपरी : प्लास्टिक तसेच थर्माकोलपासून बनविण्यात येणार्‍या उत्पादनांवर महाराष्ट्र राज्यात बंदी घालण्यात येत असल्याची घोषणा पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी विधानसभेत केली. शासनाने घेतलेला हा निर्णय कौतुकास्पद असून निसर्गासोबतच मानवी जीवनासाठी अत्यंत महत्वाचा आहे. प्लास्टिक बंदी हा सरकारने घेतलेला सर्वांत उत्तम निर्णय आहे. मात्र …

अधिक वाचा

तीनशे सैनिक पत्नींचा करण्यात आला विशेष सन्मान

मराठा बटालियन 250 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल पिंपरी : मराठा बटालिन (काली पाचवी)च्या स्थापनेला 250 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त 300 सैनिक पत्नींचा विशेष सन्मान करण्यात आला. पिंपळे गुरव येथील निळूफुले नाट्यगृहात हा कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अश्‍विनी जगताप होत्या. यावेळी उपमहापौर शैलजा मोरे, स्थायी समिती सभापती ममता गायकवाड, नगरसेवक शत्रुघ्न काटे, …

अधिक वाचा

भाडेकरूंची माहिती द्या

पिंपरी : आकुर्डी येथील भाडेतत्वावर राहणार्‍या दहशतवादी संघटनेशी संबंधित दोघांना दहशतवाद विरोधी पथकाने नुकतीच अटक केली आहे. त्यामुळे नोकर व भाडेकरू यांची माहिती पोलिसांना देण्याचे आवाहन परिमंडळ तीन पोलिस उपायुक्त शिंदे यांनी केले. माहिती न देणार्‍यांवर खटले दाखल करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. आकुर्डी येथून अटक करण्यात आलेले दोघेही एका …

अधिक वाचा