चांद्रयान-२ पासून आज लँडर आणि रोव्हर वेगळे होणार !

0

नवी दिल्ली: संपूर्ण स्वदेशी बनावटीचा भारताच्या महत्वकांक्षी चांद्रयान-२ मोहिमेसाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण चांद्रयान-२ सोबत जोडलेले लँडर आणि रोव्हर आज मुख्य यानापासून वेगळे होणार आहेत. त्यापूर्वी रविवारी संध्याकाळी इस्रोच्या वैज्ञानिकांनी चांद्रयान-२ ची अंतिम कक्षा सुधारणा यशस्वीरित्या पार पाडली. आज दुपारी १२.४५ ते १.४५ च्या सुमारास विक्रम लँडर आणि प्रग्यान रोव्हर चांद्रयान-२ पासून वेगळे होतील.

यानापासून वेगळे झाल्यानंतर विक्रम लँडरला चंद्रावर उतरवण्याची प्रक्रिया सुरु होईल. शनिवारी ७ सप्टेंबर मोहिमेसाठी अत्यंत महत्वाचा दिवस असेल. त्यादिवशी विक्रम लँडर आणि रोव्हर चंद्रावर उतरतील. प्रग्यान रोव्हर चंद्राचा पृष्ठभाग, पाणी, खड्डे यासंबंधीची माहिती इस्रोला पाठवेल. यातून चंद्राबद्दल अज्ञात असलेल्या अनेक गोष्टींची उकल होऊ शकते.