मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली कोरोना लस

मुंबई: देशभरात कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरु आहे. आज राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना लस घेतली. जे.जे. रुग्णालयात जाऊन उद्धव ठाकरे यांनी लस घेतली. यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी ही कोरोना लस घेतली आहे.