खडसेंबाबत मुख्यमंत्रीच निर्णय घेतील- गिरीश महाजन

0 1

पुणे- भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी जवळपास दोन वर्षे राजकीय वनवास भोगल्यानंतर त्यांना न्यायालयाकडून क्लीन चीट देण्यात आली. ज्यामुळे राजकीय पटलावर आता बऱ्याच घडामोडी होण्याची चिन्हं आहेत. त्यांच्या अनुभावाचा नक्कीच सरकारला फायदा होईल, असं म्हणत राजकारणात दांडगा अनुभव असणाऱ्या खडसेंच्या मंत्रीपदाबाबत मुख्यमंत्रीच निर्णय घेतील असे जलसंपदामंत्री महाजन यांनी सांगितले. पुण्यात एका कार्यक्रमात त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.

एकनाथ खडसेंना न्यायालयाकडून क्लीन चीट मिळाली आहे. त्यामुळे आता त्यांच्या मंत्रीपदाचा मार्ग मोकळा होईल. त्यांच्या अनुभावाचा नक्कीच सरकारला फायदा होईल, असे म्हणत राजकारणात दांडगा अनुभव असणाऱ्या खडसेंच्या मंत्रीपदाबाबत खुद्द मुख्यमंत्रीच निर्णय घेतील असे महाजन म्हणाले. खडसेंना क्लीन चीट मिळण्यामागोमागच आता छगन भुजबळदेखील तुरुंगातून बाहेर आल्यामुळे राजकारणात बरीच गणितं बदलण्याची चिन्हं आहेत.

मुख्य म्हणजे खडसेंवरील ठपका दूर झाला असला तरीही त्यांची भाजपा नेतृत्तावर असणारी नाराजी काही केल्या लपून राहिलेली नाही. त्यामुळे आता खडसेंविषयी मुख्यमंत्री काय निर्णय घेणार आणि प्रकरणाला काय वळण मिळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.