निवडणुकीमुळे खान्देशात विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलल्या

0

जळगाव – लोकसभा सार्वत्रिक निवडणूक लक्षात घेवून कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या 22 ते 24 एप्रिल आणि 28 ते 30 एप्रिल, 2019 या कालावधीत होणार्‍या विविध अभ्यासक्रमांच्या सर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

विद्यापीठ परिक्षेत्रातील जळगाव, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात 23 व 29 एप्रिल रोजी लोकसभा निवडणुकीसाठी मतदान घेण्यात येणार आहे. त्यामुळे 22 ते 24 आणि 28 ते 30 एप्रिल या कालावधीत होणार्‍या विविध अभ्यासक्रमांच्या परीक्षा पुढे ढकलण्यात येत असून विद्यापीठाच्या संकेतस्थळावर सुधारित वेळापत्रक लवकरच जाहीर केले जाणार आहे. निवडणुकीच्या अनुषंगाने परीक्षांच्या वेळापत्रकात पुन:श्च काही बदल झाल्यास असे बदल देखील वेळोवेळी संकेतस्थळावर उपलब्ध करुन दिले जातील याची महाविद्यालयांनी व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी. अद्ययावत माहितीसाठी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर वेळोवेळी भेट द्यावी, असे आवाहन परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक बी.पी.पाटील यांनी केले आहे.