जिल्ह्यात नव्याने आढळले २८८ कोरोना रूग्ण

जळगाव शहरात सर्वाधिक १३९ रूग्ण

जळगाव – जिल्ह्यात कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. शनिवारी दिवसभरात नव्याने २८८ रूग्ण आढळले. यात जळगाव शहरातील सर्वाधिक  १३९ रूग्णांचा समावेश आहे. दिवसभरात चोपडा तालुक्यातील एका रूग्णाचा मृत्यू झाला. आत्तापर्यंत एकूण 60, 470 रूग्ण आढळून आले असून
त्यापैकी 56, 845 रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

इतर तालुक्यांमध्ये जळगाव ग्रामीण ८, भुसावळ १४, अमळनेर ८, चोपडा १५, पाचोरा १३, भडगाव ११,
धरणगाव ३, यावल ५, एरंडोल २२, जामनेर १५, रावेर २, पारोळा ४, चाळीसगाव १७, मुक्ताईनगर ८, बोदवड २, इतर जिल्ह्यातील २ असे एकूण २८८ रूग्ण आढळून आले.