देवेंद्र फडणवीस हे शिवसैनिकच ; सुधीर मुनगंटीवार

0

मुंबई: मुख्यमंत्री पदावरून राज्यात सेना, भाजपा मध्ये अजूनपर्यंत वाटाघाटी पूर्ण झाल्या नाही. शिवसेना, भाजपामध्ये काही महत्वाच्या खात्यावरून वाद सुरु आहे. शिवसेनेकडून अडीच, अडीच वर्षासाठी मुख्यमंत्री पदाची मागणी करण्यात येत आहे. राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी देवेंद्र फडणवीस हे शिवसैनिकच असून, आम्ही मुख्यमंत्रिपद हे शिवसेनेलाच दिले असल्याचा टोला त्यांनी शिवसेनेला लगावला. दरम्यान, येत्या आठवड्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील, तसेच भाजपा शिवसेनेचा एकत्र शपथविधी होईल, असं मुनगंटीवार यावेळी म्हणाले.

‘नाना करते प्यार तुम्हीसे कर बैठे’ असं म्हणतं शिवसेना आमच्यासोबत येईल. लग्नाची बोलणी आणि खातेवाटप माध्यमांसमोर बोलू नये असंही ते विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना म्हणाले. दरम्यान, सत्तावाटपाबाबत आमची चर्चा सुरू आहे. परंतु शिवसेना ही १३ पेक्षा अधिक खात्यासांठी पात्र आहे, असं मतही त्यांनी व्यक्त केलं.

यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ५०-५० टक्क्यांच्या फॉर्म्युलावर कधी चर्चा झाली नसल्याचं सांगितलं होतं. फिफ्टी-फिफ्टीच्या फॉर्म्युल्यावर कधीही चर्चा झाली नाही, असे जर मुख्यमंत्री बोलत असतील तर आपल्याला सत्याची व्याख्याच बदलावी लागेल, अशा शब्दांत राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला होता. शिवसेनेच्या मागणीलाही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट नकार देत मुख्यमंत्रिपद देण्यास नकार दिला होता. यानंतर शिवसेनेने सत्तास्थापन करण्यासाठी आयोजित करण्यात आलेली बैठक रद्द केली होती.