इंधन दरवाढीविरोधात जिल्हा काँग्रेसची निदर्शने

0

जाखेटे पेट्रोलपंपावर शहर काँग्रेसतर्फे ‘गांधीगिरी’

जळगाव – केंद्र शासनाने शेतकर्‍यांची कर्जमाफी जाहीर केली परंतु शेतकर्‍यांना त्याचा लाभ अद्याप देखील मिळालेली नाही. केंद्र शासनाने पेट्रोल डिझेलवर कर लावण्याची घोषणा करताच त्याच्या किंमतींमध्ये वाढ झाली असल्याने केंद्र शासनाचा विरोधात जिल्हा काँग्रेसतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.
राष्ट्रीकृत बँका पीक कर्ज वाटपाबाबत शेतकर्‍यांची अडणुक करीत असून शासनाचे धोरण हे उदासीनतेचे आहे. पावसाळ्यात अनेक ठिकाणी भिंत पडल्याच्या तर तिवरे धरणाला भगदाड पडून त्याठिकाणी १९ निष्पाप वाहून गेले. ठेकेदाराने निकृष्ठ दर्जाचे काम केल्यामुळे धरण फुटले तसेच याकडे अधिकार्‍यांनी देखील हलगर्जीपणा केल्यामुळे ही घटना घडली. मात्र राज्य शासनाचे मंत्री बेताल वक्तव्य करीत आहे. पेट्रोल वाढीमूळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले गेले असून महागाईचा आगडोंग उसळण्याची शक्यता आहे. इंधन दरवाढ त्वरीत कमी करण्यासाठी कर रद्द करण्यासह विविध मागण्यांसाठी जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. आंदोलनात जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. संदिप पाटील, महानगराध्यक्ष डॉ. राधेशाम चैधरी, माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, सरचिटणीस अ‍ॅड. ललिता पाटील, डि. जी. पाटील यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


शहर काँग्रेसतर्फे ‘गांधीगिरी’ करून सरकारचा निषेध
शहरातील जाखेटे पेट्रोल पंपावर शहर जिल्हा काँग्रेसतर्फे पेट्रोल व डिझेलच्या अलीकडेच झालेल्या दरवाढी विरोधात अध्यक्ष डॉ राधेश्याम चौधरी यांच्या नेतृत्वात प्रतीकात्मक आंदोलन करण्यात आले. केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी पेट्रोल भरणार्‍या ग्राहकांना गुलाब पुष्प देऊन प्रतीकात्मक आंदोलन करण्यात आले. यावेळी सलीम पटेल, ब्लॉक अध्यक्ष नदिम काझी, श्याम तायड़े, जगदीश गाढे, ज्ञानेश्वर कोळी, दीपक सोनवणे, मनोज सोनवणे, शफी बागवान, शशि तायड़े, जाकिर बागवान, बाबा देशमुख, योगेश देशमुख, मोहसिन पिंजारी, गोकुळ चव्हाण, नरेंद्र पाटिल, कैलास पाटिल, सुभाष ठाकरे, सुनील पाटील उपस्थित होते.