एक्झिट पोलच्या निकालाने खचून जाऊ नका: प्रियंका गांधी

0 1

नवी दिल्ली: कॉंग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी वडेरा यांनी निकालाच्या दिवशी स्ट्राँग रूम आणि मतदान केंद्र सोडून कुठे जाऊ नका, त्या ठिकाणी ठाण मांडून बसा असे आवाहन आपल्या कार्यकर्त्यांना केले आहे. एक संदेश त्यांनी एका ऑडीओ क्लिपच्या माध्यमातून दिला आहे. एक्झिट पोलची अफवा असून त्या एक्झिट पोलने खचून जाऊ नका असे त्यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे. देशात पुन्हा एकदा एनडीएचे सरकार येणार आहे असे एक्झिट पोलमधून समोर आले आहे. त्यामुळे प्रियंका यांनी आपल्या कार्यकर्त्यांना धीर आहे.

कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी हतबल व्हावे यासाठीच अशा अफवा पसरवल्या जात आहे. आपल्या मेहनतीला नक्की फळ मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. निकालाच्या दिवशी कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी निकालाच्या ठिकाणावर ठाण मांडून बसा, तसेच प्रत्येकाने दक्ष राहण्याचे राहा असे सांगितले आहे.

दरम्यान विरोधी पक्षाच्या नेत्यांनी एक्झिट पोलवरून टीका करणे सुरु केली आहे. आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री तथा तेलगु देसम पक्षाचे अध्यक्ष चंद्राबाबू नायडू यांनी एक्झिट पोलवर टीका करत लोकांची नाळ ओळखण्यात एक्झिट पोल अपयशी ठरले आहे. वास्त्वविकतेपासून एक्झिट पोल असे सांगत, केंद्रात रालोआ आणि आंध्रप्रदेशमध्ये टीडीपीच सरकार बसेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही एक्झिट पोलवर विश्वास नसल्याचे ट्वीट केले आहे.