VIDEO : फेसबुक दिंडीमुळे पालखी सोहळ्याला आधुनिकेतेची जोड

0

पुणे – दरवर्षी आषाढी एकादशी निमित्त पालखी सोहळ्याचे आयोजन केले जाते. हे वर्ष जगद्गुरू संत श्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे ३३३ वे वर्ष आहे. दरम्यान दिंडीला आधुनिक सोशल मीडियाची जोड मिळाली आहे. काही तरुणांनी एकत्र येत गेल्या आठ वर्षापासून पायी निघणाऱ्या दिंडीला फेसबुकच्या माध्यमातून विशेष प्रसिद्ध दिली आहे. यावर्षीही अशीच फेसबुक दिंडी निघाली आहे.

वारीच्या फोटो आणि व्हिडीओ सोबत एक सामाजीक जाणीव ठेऊन २०१६ साली फेसबुक दिंडी टीमने राबविलेल्या ‘पाणी वाचवा’ या जलसंधारणाच्या मोहिमेला लोकांनी भरभरून प्रतिसाद दिला तसेच गतवर्षी वारी ‘ती’ ची या उपक्रमातही लोक सहभागी झाले. फेसबुक दिंडी यावर्षी ‘नेत्रवारी’ या उपक्रमातून मरणोत्तर नेत्रदान करण्याचे आवाहन करीत आहे आणि नेत्रदानाचे फॉर्म भरून घेत आहे.