Wednesday , November 21 2018
Breaking News

featured

सुषमा स्वराज यांचा आता थांबण्याचा निर्णय; २०१९ ची निवडणूक लढविणार नाही

इंदूर- केंद्रीय परराष्ट्र मंत्री आणि भाजप नेत्या सुषमा स्वराज यांनी २०१९ मध्ये लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचे जाहीर केले आहे. त्यांनी आज इंदूर येथे आपल्या प्रकृती स्वास्थ्याचे कारण देत ही घोषणा केली. भाजपाच्या प्रचारासाठी मध्य प्रदेश येथे आलेल्या सुषमा स्वराज पत्रकार परिषदेत बोलत होत्या. आपल्या धारदार वक्तृवासाठी प्रसिद्ध असलेल्या सुषमा स्वराज …

अधिक वाचा

भारत वि.ऑस्ट्रेलिया २०-२० सामना: भारतीय संघ जाहीर

नवी दिल्ली- भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यादरम्यान पहिला टी-२० सामना उद्या बुधवारी होणार आहे. बीसीसीआयने यासाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. के.एल राहुलला अंतिम ११ मध्ये संधी देण्यात येणार की पाच गोलंदाजांसह भारतीय संघ मैदानात उतरणार हे पाहणे उत्सुकतेचे आहे. टी-२० संघामध्ये परतल्यानंतर भारतीय संघाची जबाबदारी पुन्हा एकदा विराट कोहलीच्या खांद्यावर …

अधिक वाचा

पुलगावातील केंद्रीय दारुगोळा भांडारात स्फोट; सहा जण ठार

वर्धा- सैन्य दलासाठी बॉम्ब, हातबॉम्ब, अग्निबाण, दारूगोळा, अद्ययावत शस्त्रास्त्रांचा साठा करणाऱ्या वर्धा येथील पुलगावातील केंद्रीय दारूगोळा भांडारात जुने बॉम्ब निकामी करताना स्फोट झाला आहे. या स्फोटात सहा जण ठार तर ११ जण जखमी झाले आहे. आज सकाळी ५.३० वाजेच्या सुमारास मुदतबाह्य बॉम्ब निकामी केले जात होते. यादरम्यान सहा जणांचा मृत्यू …

अधिक वाचा

राजस्थानमध्ये कॉंग्रेसने २७ तर भाजपने २३ महिलांना दिली उमेदवारी

जयपूर- देशभरातील पाच राज्यात निवडणुका होत आहे. राजकीय वातावरण तापले आहे. राजकीय आरोप-प्रत्यारोप होत आहे. प्रत्यके पक्ष तरुण व महिलांना उमेदवारी देण्यात स्वत:ला अग्रेसर ठेवण्याचा प्रयत्न करीत आहे. राजस्थानमध्ये दोनशे जागांसाठी निवडणूक होत आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु आहे. दरम्यान कॉंग्रेसने २७ तर भाजपने २३ महिलांना उमेदवारी दिली आहे. …

अधिक वाचा

मुख्यमंत्र्यांनी माझी अट मान्य केली; अनिल गोटे यांचा राजीनामा मागे

धुळे- धुळे महापालिका निवडणूक आपल्या नेतृत्वाखाली लढल्या जाव्यात या अटींवर आपण राजीनामा मागे घेतल्याचे आमदार अनिल गोटे यांनी जाहीर केले आहे. मुख्यमंत्र्यांशी सुमारे सव्वातीन तास झालेल्या चर्चेत आपल्या अटी मान्य केल्यामुळे राजीनामा मागे घेतल्याचे त्यांनी सांगितले. संरक्षणमंत्री सुभाष भामरे, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यावर गंभीर आरोप करत गोटे यांनी राजीनामा दिला …

अधिक वाचा

विधानभवनासमोर विरोधकांची घोषणाबाजी

मुंबई- आजपासून राज्याच्या विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. दरम्यान विविध प्रश्नावरून विरोधकांनी विधान भवनाच्या पायऱ्यावर बसून शर्कर विरोधात घोषणाबाजी केली. दुष्काळसह अनेक मुद्द्यावरून विरोधकांनी सरकारला लक्ष केले आहे. मुख्यमंत्री विधान भवनात जात असतांना विरोधकांनी घोषणाबाजी केली. मराठा, मुस्लिम, धनगर समाजाला आरक्षण द्या अशी मागणी विरोधकांनी लावून धरली आहे. Share …

अधिक वाचा

या तारखेला सुरु होऊ शकते राम मंदिर निर्माणाचे काम

लखनौ-सध्या देशभरात राम मंदिर उभारण्याची मागणी सुरु आहे. २०१४ च्या निवडणुकीवेळी भाजपने सत्तेत आल्यानंतर राम मंदिर उभारण्याचे आश्वासन दिले होते. मात्र अजूनही कार्यवाही झालेली नसल्याने राम मंदिर केंव्हा उभारणार अशी विचारणा होत आहे. राम मंदिराची उभारणी आता नाही तर कधी नाही असे भक्त म्हणतात. यासाठी अध्यादेश काढण्याची मागणी होत आहे. …

अधिक वाचा

रेल्वेच्या एसी कोचमधून प्रवास करणाऱ्यांनी वर्षभरात चोरली १४ कोटींचे चादर, उशी

नवी दिल्ली- भारतीय रेल्वे प्रवाश्यांच्या सोयीसाठी नवनवीन सुविधा पुरवीत आहे. मात्र काही प्रवासी हे रेल्वेच्या मालमत्तेचे नुकसान करतात. सुशिक्षित प्रवासी देखील रेल्वेच्या मालमत्तेचे नुकसान करतात. रेल्वेच्या एसी कोचमधून प्रवास करणाऱ्या श्रीमंत श्रेणीतील प्रवाश्यांनी वर्षभरात १४ कोटींची चादर, उशी चोरून नेली आहे. मागील आर्थिक वर्षात देशभरातून एसी कोचमधून जवळपास २१ लाख …

अधिक वाचा

शनिवारपासून ओला, उबर चालकांचा बेमुदत संप

मुंबई- विविध मागण्यांसाठी ओला, उबर चालकांनी पुन्हा संपाचा इशारा दिला आहे. शनिवार १७ नोव्हेंबरपासून संपावर जाणार आहे. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत संप सुरूच राहील, असे महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघ व मराठी कामगार सेनेतर्फे सांगण्यात आले आहे. तसेच सोमवार, १९ नोव्हेंबर रोजी मंत्रालयावर मोर्चाही काढण्यात येणार आहे. आझाद …

अधिक वाचा

अवकाशात दळणवळण उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण

नवी दिल्ली-भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्त्रोने आज बुधवारी संध्याकाळी सीएसएमव्ही-एलके-III-D2 या प्रक्षेपकाद्वारे GSAT-29 या दळणवळण उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले. जीएसएलएव्हीने संध्याकाळी ५.०८ मिनिटांनी जीसॅट-२९ उपग्रहासह अवकाशाच्या दिशेने उड्डाण केले. आंध्रप्रदेशातील श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अवकाश तळावरुन हे प्रक्षेपण झाले. जीसॅट-२९ला अवकाश कक्षेत सोडल्यानंतर इस्त्रोने मोहिम पूर्ण झाल्याचे टि्वट केले. Share …

अधिक वाचा
error: Content is protected !!