आता मोदींना आधार शेअरिंगचे चॅलेंज

0

नवी दिल्ली-भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण म्हणजेच ट्रायचे चेअरमन आर.एस. शर्मा यांनी आधार नंबर शेअर केल्यानंतर आपली कोणतीही गोपनीय माहिती उघड होत नसते असा दावा करत स्वतःचा आधार नंबर ट्वीटर केला. त्यानंतर काही तासातच फ्रान्सच्या इलियट अँडरसन या हॅकरने त्यांची गोपनीय माहिती उघड करत शर्मा यांना आधार शेअरिंग करणे धोकेदायक असल्याची जाणीव करून दिली. हीबाब ताजी असतांना फ्रान्सच्या हॅकरने थेट आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच चॅलेंज दिले आहे. मोदींनी आपला १२ अंकी आधार क्रमांक सार्वजनिक करावा असे चॅलेज इलियट अँडरसन याने दिले आहे.

ट्रायच्या अध्यक्षांचा डेटा हॅक झालाच नसून हॅकरने त्यांची पहिल्यापासूनच सार्वजनिक असलेली माहिती दाखवत आधारचा डेटा हॅक झाल्याचा केलेला दावा खोटा असल्याचे युआयडीएआयने म्हटले होते, त्यानंतर हॅकरने आता थेट पंतप्रधान मोदींनाच चॅलेंज दिले आहे.