युती माझ्यामुळेच; ना. गिरीश महाजनांचा दावा

0

जळगाव – राज्यात भाजपा आणि शिवसेनेची युती ही माझ्यामुळेच झाली, असा दावा जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी केला आहे. कोल्हापूर येथे झालेल्या युतीच्या सभेत शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी देखील त्यांच्या भाषणात गिरीश महाजन यांच्यासाठी आपण युती केली असल्याचे सांगितले होते, अशी माहिती ना. महाजन यांनी दिली.

लोकसभेच्या जळगाव मतदारसंघातील भाजपा उमेदवार खा. रक्षा खडसे यांचा उमेदवारी अर्ज गुरुवारी, दाखल करण्यात आला. यानंतर आयोजित महायुतीच्या मेळाव्यात ना. महाजन बोलत होते. ते म्हणाले की, हल्ली मला ‘संकटमोचक’, ‘सुपरमॅन’ अशा शब्दांच्या बिरुदावल्या लावल्या जात आहेत. मात्र, या अविर्भावात राहू नका. कारण मी एकटा काहीही करू शकत नाही. विजयासाठी आपण सर्वांनी काम करण्याची गरज असल्याचे महाजन यांनी सांगितले.

राज ठाकरेंच्या जिभेला हाड नाही

काँँग्रेस व राष्ट्रवादी कॉँग्रेसचे 25 जण भाजपात येण्यास उत्सुक असून, त्यांचा मार्ग देखील जळगावमधून जाणार असल्याचे महाजनांनी सांगितले. महाजन यांनी राज ठाकरे यांच्यावरही टीका करीत त्यांच्या जिभेला हाडच नसून, ते काहीही बडबड करत असल्याचा आरोप केला.