रचनात्मक पद्धतीने काम केल्याने गिरीश महाजनांचा विजय

0

जामनेर: पक्ष शिस्ती प्रमाणे स्थानिक पातळीवर बुथ आणि सेक्टरची बांधणी त्यावर सतत काम करणारे कार्यकर्ते या रचनात्मक पद्धतीने काम केल्याने कोणत्याही निवडणुकीत विजय सहज मिळवता येतो हे महाजनांनी दाखवून दिले आहे. महाजनांकडे असलेली तरुणांची फळी हेच त्यांच्या यशाचे रहस्य आहे. तालूक्यासह मतदारसंघातील छोट्या मोठ्या निवडणुकात महाजनांनी आतापर्यंत सहज विजय मिळवला आहे.

तालुक्यातील संस्थावर भाजपाचे वर्चस्व

मतदारसंघातील शेकडो ग्रामपंचायती, शेंदुर्णी, जामनेर नगर परिषद, सहकार क्षेत्रातील सर्वच संस्थावर भाजपचे वर्चस्व राहिले आहे. पार्श्वभूमी पाहता महाजनांना पराभूत करणे ही गोष्ट विरोधकांच्या आवाक्या बाहेरची बनली आहे. विधानसभा निवडणुकीत जामनेर मतदारसंघात एकही प्रादेशिक किंवा राष्ट्रीय स्तरावरील नेत्याला प्रचार करण्यासाठी गरज पडली नाही. महाजन स्वतःच प्रबळपणे मतदारसंघात वैयक्तिक गाठीभेटी घेत मतदारांशी संपर्क साधत होते.

गिरीष महाजन व आरोग्य सेवा हे समीकरण

गेल्या दोन तपापासून गिरीष महाजन हे अखंडपणे आरोग्य सेवेच्या माध्यमातून जनतेची सेवा करत आहे. तालुक्यासह जिल्ह्यातील अनेक रुग्णांना याचा लाभ मिळाला आहे. अनेक असाध्य रोगावरील शस्त्रक्रिया व औषधोपचार महाजनांच्या कार्यामुळे सर्व रुग्णांना सहज उपलब्ध झालेला आहे. निरनिराळ्या ठिकाणी नेमलेल्या आरोग्य दुतां मार्फत आरोग्य सेवेचा वसा महाजन लिलया पार पाडतात ही महाजन यांची सर्वात जमेची बाजू आहे.