काश्मीरमध्ये हिंदू असते तर ३७० रद्द केले असते का? पी. चिदम्बरम

0

नवी दिल्ली: मागच्या आठवड्यात केंद्र सरकारने काश्मीर मधून ३७० कलम रद्द केल्यानंतर देशातील विरोधी पक्षाच्या नेत्यांनी या निर्णयाला विरोध सुरु केला आहे. या निर्णयाला विरोध करत कॉंग्रेसचे माजी अर्थमंत्री यांनी भाजपावर टीका करत, काश्मीरमध्ये हिंदू बहुसंख्य असते तर कलम ३७० रद्द केले असते का? असा प्रश्न मोदी सरकारला विचारला आहे. जम्मू काश्मीर हे अस्थिर आणि अशांत आहे. भारतीय प्रसारमाध्यम त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

काश्मीर मधील परिस्थिती शांत असल्याचे दाखवले जातं आहे मात्र ते वास्तव नाही. भारतीय मीडिया काश्मीरमधील अशांत स्थिती दाखवत नसेल तर याचा अर्थ तिथे सारं काही आलबेल आहे असा होत नाही असंही चिदंबरम यांनी म्हटले आहे. विरोधी पक्षांमध्ये भाजपा बाबत भीती आहे. त्याचमुळे कलम ३७० हटवण्यास फारसा विरोध झाला नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

कलम ३७० रद्द करण्याला काँग्रेसने कडाडून विरोध दर्शवला होता. मात्र भाजपाकडे खासदारांचे बहुमत असल्याने हे विधेयक हटवण्याचा प्रस्ताव एकमुखाने मान्य करण्यात आला. काँग्रेसने यासंदर्भात चर्चेची मागणी केली होती. या विधेयकाच्या चर्चेदरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद तसेच अधीर रंजन चौधरी यांच्यात खडाजंगी पाहण्यास मिळाली होती.