हिंदू राष्ट्राच्या परिवर्तनासाठी सज्ज व्हा!

0

व्ही. रवीकुमार अय्यर यांचे आवाहन

जळगाव- संपूर्ण जगात इसाई, इस्लाम, हिंदू व बौद्ध हे तीन सर्वांत मोठे धर्म आहे. अनेक देशातील लोक आपले पूर्वज आर्य म्हणून असल्याचे सांगून त्यांनी हिंदू धर्माचा स्वीकार केला आहे. काही देशात हिंदुत्ववादी होण्यासाठी आंदोलन करीत आहे. त्यामुळे भविष्यात होणार्‍या हिंदू राष्ट्र परिवर्तनाची तयारी करण्यासाठी सज्ज राहण्याचे आवाहन व्ही. रवीकुमार अय्यर यांनी केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे आयोजित बौद्धिक वर्गात ते बोलत होते. छत्रपती संभाजीराजे नाट्यगृहात बौद्धिक वर्गाचे आयोजन करण्यात आले होते.

प्रमुख अतिथी म्हणून अ‍ॅड. प्रकाश पाटील होते. व्यासपीठावर रा. स्व. संघाचे केंद्रीय संपर्क सदस्य शरदराव ढोले, जिल्हा सरसंघचालक राजेश पाटील, शहर सरसंघचालक विलास भोळे, प्रांत प्रचारक रामानंद काळे, भवानी मंदिर संस्थानचे महेश महाराज त्रिपाठी उपस्थित होते.

सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते व्ही. रवीकुमार अय्यर लिखित इंडोनेशियाचे पुनरुत्थान या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. व्ही. रवीकुमार अय्यर पुढे म्हणाले की, ज्यावेळी समाज बदलतो त्यावेळी त्याठिकाणी असलेली राजनीती बदलून त्यांचा सन्मान बदलून त्याचा परिणाम हा देशावर होत असतो. सौदी अरेबियातील रहिवाशांनी हिंदूत्वातील संस्कृतीचा स्वीकार केल्यानंतर त्याठिकाणी मोठ्या गतीने बदल होत आहे. त्याठिकाणी पूर्वी महिला नोकरी करू शकत नव्हत्या त्यांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य नव्हते. परंतु आता त्या ठिकाणच्या महिलांना हे स्वातंत्र्य मिळाले आहे.

हिंदू धर्म नव्हे संस्कृती -अ‍ॅड. पाटील
प्रमुख अतिथी अ‍ॅड. प्रकाश पाटील बोलताना म्हणाले की, ज्यावेळी मी हिंदुत्वाचा विचार करतो त्यावेळी हा धर्म नसून ही संस्कृती आहे. हा फरक प्रत्येकाने लक्षात घेतला पाहिजे. पूर्वी हिंदूत्वाचा प्रचार मोठ्या प्रमाणात केला जायचा परंतु आता प्रचार करणे शक्य नाही. ज्यावेळी आपण धर्माचा विचार करतो त्यावेळी त्याच्या मूलभूत बाबींचा देखील विचार केला पाहिजे.

अयोध्येत राम मंदिर केव्हा?
जगातील इतर देशांमध्ये हिंदू धर्माची मंदिरे बांधली जात आहे. इंडोनेशिया इस्लामिक राष्ट्रात मंदिर बांधले जात आहे. परंतु भारतात अयोध्येत राम मंदिर केव्हा होईल हे सांगू शकत नाही. इतिहासाच्या अज्ञानामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. येणार्‍या काळात बदल करण्याची आपल्यात ताकद असली पाहिजे असल्याचे अय्यर यांनी यावेळी सांगितले.