IMR मध्ये प्राध्यापक आणि विद्यार्थी यांच्यात ऑनलाईन समन्वय प्रणाली

0

जळगाव:येथील kce’s IMR मध्ये सध्याच्या लाॅकडाउन काळात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून विद्यार्थी आणि प्राध्यापक यांच्यात इन्टरनेट च्या माध्यमातुन समन्वय साधण्यात येऊन त्यांना विडिओ लेक्चर, ब्लॉग, प्रेझेंटेशन, ERP सिस्टम तसेच वाॅट्सप ग्रृपच्या उपयोगातून विद्यार्थी प्राध्यापकांच्या संपर्कात आहेत. ह्या प्रयत्नात E Learning आणि ICT आधारीत शैक्षणिक प्रणाली सुरु ठेवण्यात आली आहे. तर प्राध्यापकांचे ब्लॉग हे नियमित अपडेट होत असुन हा ओपन सोर्स फक्त आय एम आर च्या विद्यार्थ्यांपुरता मर्यादित नसुन सर्वच विद्यार्थी त्याचा फायदा घेत आहेत. या ब्लॉगला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. तसेच याच माध्यमातुन विद्यार्थ्यांना सराव चाचणी परीक्षा (आॅब्जेटिव्ह आणि सब्जेक्टीव्हची) घेतली जात आहे. आणि हि पध्दत अतिशय यशस्वी रितीने मॅनेजमेंट आणि काॅम्पुटर दोन्ही विभागात राबवली जात असल्याची माहिती संस्थेच्या संचालक प्रा डॉ शिल्पा बेंडाळे यांनी दिली आणि सर्व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना या E Learning प्रणालीत सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.