भारतीय महिला क्रिकेट संघाची ऐतिहासिक कामगिरी; २४ वर्षांनी न्यूझीलंडमध्ये जिंकली मालिका

0

माऊंट मोनगानुई- भारत विरुद्ध न्यूझीलंड महिला क्रिकेट संघात सुरु असलेल्या एकदिवसीय मालिका भारतीय महिला संघाने खिशात घातली आहे. भारतीय महिला क्रिकेट संघाने न्यूझीलंडमध्ये तब्बल २४ वर्षांनी मालिका जिंकली. भारताला हा ऐतिहासिक विजय होता. तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत भारताने दोन सामने जिंकून विजयी आघाडी घेतली आहे. या दमदार विजयासह भारतीय संघाने महिलांच्या क्रमवारीत दुसरे स्थान पटकावले आहे.

भारतीय पुरुष संघाने दहा वर्षांनी न्यूझीलंडमध्ये वन डे मालिका जिंकली, तर महिला संघानेही मालिका जिंकत पराक्रम केले आहे. आज मंगळवारी झालेल्या दुसऱ्या वन डे सामन्यात ८ विकेट राखून विजय मिळवला. भारताने ३५.२ षटकात २ बाद १६६ धावा पूर्ण करत विजय मिळवला.

पहिल्या सामन्यातील शतकवीर स्मृती मानधनाने पुन्हा एकदा विजयात मोलाचा वाटा उचलला. तिला कर्णधार मिताली राजने उत्तम साथ दिली आणि दोघींनी भारताच्या विजयाचा मार्ग सुकर केला.