बेरोजगार नव्हे तर रोजगारास अपात्र आहेत भारतीय तरुण – का आणि कसे?

0

प्रा. पुनीत शर्मा

स्पर्धात्मक युगात विद्यार्थ्यांना बेरोजगारीची समस्या भेडसावत असल्याने दै. जनशक्ति महाराष्ट्रातील विशेषतः जळगावच्या युवांसाठी एक खास सत्र सुरु करत आहेत, ज्यात दर शनिवारी युवकांसाठी रोजगारभिमुख टिप्स दिल्या जातील. ह्या क्षेत्रातील तज्ञ व्यक्तींमार्फत युवकांना मार्गदर्शन केले जातील की कश्याप्रकारे बायोडाटा बनवावा, कुठल्या चुका करू नयेत, इंटरव्ह्यूला जातांना तयारी कशी करावी, ग्रुप डिस्कशन्स कसे करावे, पत्रव्यवहार कसा असावा, इंटरव्ह्यूला कुठले प्रश्न विचारले जातात आणि असे अनेक मुद्दे आम्ही प्रकाशित करू.

आय.बी.एम. ह्या जागतिक सोफ्टवेअर कंपनीच्या वार्षिक सभेत बोलतांना चेअरपर्सन आणि सी.ई.ओ. मिसेस गिनी रोमेटी ह्यांनी एक विधान केलं की भारताचे तरुण हे आय.बी.एम. मध्ये किंवा आयटी क्षेत्रात नोकरीसाठी पात्र नाहीये. भारतीय तरुणांबाद्द्ल असं काही म्हटले जाण्याची ही पहिली वेळ नाहीये ह्याआगोदर देखील अनेकांनी असंच म्हटलंय की भारतीय पदवीधर हे नोकरीसाठी अपात्र आहेत. त्यामुळे ही बाब समोर आली की भारतीय पदवीधर हे बेरोजगार ह्यामुळे आहेत कारण ते जागतिक कंपन्यांच्या नोकरीसाठी पात्र नाहीयेत.
पण ह्याउलट भारतीय शिक्षण तज्ञांनी आणि वैचारिक विद्वानांनी पडखर प्रतिक्रिया दिली पण कोणीही नाण्याची दुसरी बाजू बघायला तयार नाहीये की मुळात चूक कुठे आहे, नेमकं यामागील वास्तव काय आहे. खर तर भारताच्या छोट्या शहरतील परिस्थिती खुपच बिकट आहे. येथील बहुतांशी कॉलेज फक्त डिग्री वाटण्यातच लक्ष केंद्रित करतात आणि विद्यार्थ्यांच्या स्कील डेव्हेलपमेंट कडे सरळ पाठ फिरवतात त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थी हे रोजगारासाठी पात्र बनत नाही.
असल्या छोट्या शहराच्या प्रत्येक भागात आपल्याला एक इंग्लिश स्पिकिंग क्लास किंवा पर्सनॅलिटी डेव्हेलपमेंट इन्स्टिट्यूट नजरेस पडेल, एकमेकांच्या अगदी मोजक्या अंतरावर असलेले हे क्लासेस विद्यार्थ्यांनी खच्च भरलेले दिसतात, जे मोठ्या रकमेच्या मोबदल्यात विद्यार्थ्यांना भूलधापांच्या बदल्यात आणखी काहीही देत नाही. तर दुसरीकडे ह्या शहरात असणारे इतर शैक्षणिक इन्स्टिट्यूट हे फक्त चकाचक बिल्डिंग, सुंदर आर्किटेक्चर आणि भरघोस फीस वरच मारा देतात. ह्या शैक्षणिक संस्थानात कुठल्याही प्रकारच्या रोजगाराच्या डेव्हेलपमेंटवर लक्ष दिले जात नाही आणि परिणामी गिनी रोमेटी सारखे विधान भारताची शान घालवितात.
फेडरेशन ऑफ इंडियन चेम्बर्स ऑफ कॉमर्स एंड इंडस्ट्री (फिक्की) आणि इर्नेस्ट एंड यंग च्या संयुक्त विद्यमाने केलेल्या एका खाजगी सर्वेमध्ये डोळे उघडणारे सत्य समोर आले की, भारतातील 90% एमबीए आणि 80% इंजिनीअर हे रोजगाराच्या दृष्टीने असक्षम आहेत. असलेच काहीसे आकडे इस्पायरिंग माएंडस ने सुद्धा प्रस्तुत केले की भारतातील बेरोजगारी ही 6.1 % पर्यंत पोहोचली आहे जी मागील 45 वर्षातील सर्वाधिक आहे. भारतात नोकर्‍या खूप आहेत, आजही भारतातील सर्वश्रेष्ठ कंपन्यात 14 हजार भरगच्च पगाराच्या नोकर्‍या रिकाम्या आहेत, कारण त्यांना त्या योग्य उमेदवारच भेटत नाहीये. योग्य उमेदवार म्हणजे ज्याच्याकडे डिग्री सोबत स्किल्स आहेत.
ह्यामागील एक आणखी एक महत्त्वाचे कारण हे देखील आहे की ह्या छोट्या शहरातील आणि ग्रामीण भागातील शिक्षण पद्धती ही खुपच पारंपारिक आहे. शिक्षक हे फक्त तासिक पूर्ण करण्यावरच लक्ष देतात याउलट त्यांनी इंडस्ट्रीच्या गरजेनुसार जर शिक्षण दिले तर हमखास येथील विद्यार्थ्यांना देखील चांगल्या नोकर्‍या मिळतील. अनेक शिक्षण संस्था आजही महाराष्ट्रात खूप चांगल काम करताय, निष्ठेने ते शिक्षणाचा प्रसार करताय पण त्यांची मजबुरी ही शिक्षकांच्या अधीन आहे, ते शिक्षकांच्या आभाळा एवढ्या अपेक्षेसमोर हतबल आहेत.
ह्या परिस्थितीला बघता ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन (एआयसीटीई) ने मेनेजमेंट, इंजिनिअरिंग आणि फार्मसी शिक्षकांसाठी विशेष ट्रेनिंग सत्र आयोजित केले आहेत पण ह्यात देखील विडंबना असली आहे की हे सेंटर फक्त मोठ्या शहरातील इन्स्टिट्यूटमध्ये असणार आहे, त्यामुळे जिथे ह्याची नितांत गरज आहे तिथले लोक वंचितच राहणार हे स्पष्ट आहे.
भारत हा युवांचा देश आहे, इथली 50% लोकसंख्या ही 25 वयोगटाच्या आतील तर 65% जनसंख्या ही 35 वयोगटाच्या आतील आहे. साल 2020 पर्यंत लोकसंख्येची सरासरी ही 29 वयोगट असणार आहे तर चीन मध्ये 37 आणि जपानमध्ये 48 असेल. त्यादृष्टीने युवांच्या रोजगाराचा प्रश्न किती भीषण होणार आहे हे चित्र समोर स्पष्ट दिसतंय आणि त्यामुळेच प्रत्येक गटाने ज्यात शिक्षण संस्था, खाजगी संस्था, प्रशाकीय यंत्रणा, सरकारचे धोरण आणि पावलं हे शामिल आहेत त्यांनी आतापासूनच ह्या दिशेने काम करायला सुरुवात करायला हवी की जेणेकरून आपल्या युवाबद्द्ल असले विधान भविष्यात कोणीही देणार नाहीत.
(लेखक हे जळगावच्या के.सी.ई.संस्थेच्या आय.एम.आर. कॉलेजचे ट्रेनिंग एंड प्लेसमेंट अधिकारी आहेत)