नवी दिल्ली-विमानसेवा देणारी कंपनी इंडिगो एअरलाइन्सने आपल्या १२ व्या वर्षपूर्तीनिमित्त एक मेगा ऑफर आणली आहे. या दरम्यान इंडिगो तब्बल १२ लाख तिकीटांची स्वस्तात विक्री करणार आहे. १२ वे वर्ष असल्याने अवघ्या १२१२ रुपयांपासून तिकीटाची विक्री सुरू होत असून याद्वारे ५७ शहरांपैकी कोणत्याही शहरात प्रवास करता येईल. आजपासून या ऑफरची सुरूवात झाली असून शुक्रवारपर्यंत या ऑफरचा लाभ घेण्याची संधी ग्राहकांकडे आहे.
१० ते 13 जुलैदरम्यान ही ऑफर आहे. यादरम्यान बूक केलेल्या तिकीटाद्वारे २५ जुलै २०१८ ते ३० मार्च २०१९ पर्यंत प्रवास करता येईल असे इंडिगोकडून सांगण्यात आले आहे. विशेष म्हणजे या ऑफरअंतर्गत डोमेस्टिक तसंच इंटरनॅशनल प्रवासाचे तिकीटही बूक करता येईल असे इंडिगोने सांगितले. याशिवाय एसबीआयच्या ग्राहकांसाठी एक खास ऑफर असून एसबीआय कार्डद्वारे तिकीट बूक केल्यास ५ टक्के सूट दिली जाणार आहे. याद्वारे कमाल ५०० रुपयांची सूट मिळू शकेल. पण यासाठी किमान 3 हजार रुपयांचे तिकीट बूक करणं गरजेचे आहे.
४ ऑगस्ट २०१२ रोजी इंडिगोला १२ वर्ष पूर्ण होत आहेत. हा १२ वर्षांचा प्रवास लक्षात रहावा यासाठी आम्ही ५७ शहरांसाठी कोणत्याही विमान कंपनीचा देशातील सर्वात मोठा सेल घेऊऩ आलो आहोत. याद्वारे आम्ही आमच्या ग्राहकांचे आभार मानू इच्छितो, ग्राहकांमुळेच एवढा प्रवास आम्ही करु शकलो असे इंडिगोचे चीफ स्ट्रॅटेजी ऑफिसर विल्यम बूल्टर म्हणाले.