इन्फोसिस तब्बल १२ हजार कर्मचाऱ्यांची कपात करणार !

0

मुंबई: भारतातील तंत्रज्ञान क्षेत्रात आघाडीवर असलेल्या इन्फोसिस कंपनीला देखील आर्थिक मंदीचा फटका बसला आहे. इन्फोसिसने तब्बल १२ हजार कर्मचाऱ्यांना कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. आयटी क्षेत्रातील मोठी कंपनी म्हणून इन्फोसिसकडे पहिले जाते. बंगळूर येथे इन्फोसिसचे मुख्यालय आहे.

आर्थिक मंदीच्या फटका उद्योग, व्यवसायांना मोठ्या प्रमाणात बसला आहे. ऑटोमोबाईल क्षेत्राला याचा सर्वाधिक फटका बसला आहे. आता आयटी क्षेत्राला देखील याचे झळ पोहोचले आहे. मंदीतून बाहेर काढण्यासाठी सरकारकडून उपाययोजना व्हाव्यात अशी मागणी होत आहे.