Tuesday , March 19 2019

१८ डिसेंबर रोजी होणार आयपीएलसाठी खेळाडूंचा लिलाव !

नवी दिल्ली-पुढील वर्षी होणाऱ्या आयपीएलच्या बाराव्या हंगामासाठी १८ डिसेंबर रोजी जयपूरमध्ये लिलाव होणार आहे. विशेष म्हणजे यंदाच्या हंगामात आयपीएलची गेल्या ११ वर्षांची परंपरा खंडीत होणार आहे. खेळाडूंचा लिलाव करणारे रिचर्ड मेडली हे यंदाच्या हंगामात लिलाव करणार नाही. रिचर्ड मेडली यांच्याऐवजी ह्युज एडमेडेस हे बाराव्या हंगामाचा लिलाव करणार आहेत. एडमेडेस हे फाईन आर्ट आणि चॅरिटी ऑक्शनर म्हणून ओळखले जातात. एडमेडेस यांना ३० वर्ष लिलावाचा अनुभव आहे.

लिलावासाठी सर्व संघांमधील ७० स्थानांसाठी १००३ खेळाडू उपलब्ध असणार आहेत. यात उत्तर-पूर्व, उत्तराखंड आणि बिहार राज्यांमधील खेळाडूंचाही समावेश असेल. परदेशातील २३२ खेळाडू या लिलावासाठी उपलब्ध असतील. यापैकी ऑस्ट्रेलियाचे ३५, अफगाणिस्तानचे २७ आणि दक्षिण आफ्रिकेचे ५९ खेळाडू आहेत. लिलावातील ८०० नवख्या खेळाडूंपैकी तब्बल ७४६ खेळाडू हे भारतीयच आहेत.

Spread the love
  •  
  •  
  •  
  •  
  •  

हे देखील वाचा

बेदरकार वाहने चालविणे पडणार महागात

वाहनचालकांवर गुन्हे दाखल होणार पुणे : नो एंट्रीमधून भरधाव वाहने चालविणे आता वाहनचालकांना चांगलेच महागात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: Content is protected !!