पोलीस महासंचालकांच्या सुचना अन् पळून गेलेले प्रेमीयुगल दौंडमधून ताब्यात

0

पारोळा तालुक्यातून झाले होते रफूचक्कर ; प्रेमप्रकरणातून अल्पयीन मुलगी सात महिन्याची गर्भवती ; नऊ महिन्यानंतरही तपास न लागल्याने पीडीतेच्या आईने महासंचालकांकडे केली होती तक्रार

जळगाव : गेल्या नऊ महिन्यांपूर्वी पारोळा तालुक्यातील अल्वयीन मुलगी व तरुण प्रेमप्रकरणातून रफूचक्कर झाले होते. पारोळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होवून मुलीचा शोध लागत नसल्याने आईने थेट पोलीस महासंचालकांची भेट घेतली होती. पोलीस महासंचालकांनी पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांना आदेश दिले. यानुसार यंत्रणा हलली अन् नऊ महिन्यांपासून पलायन केलेल्या अल्पवयीन मुलीसह तरुणाला स्थानिक गुन्हे शाखेने दौंड येथून ताब्यात घेतले आहे. दरम्यान अल्पवयीन मुलगी प्रेमप्रकरणातून नऊ महिन्यांची गर्भवती असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

महासंचालकांच्या सुचना अन् अधीक्षकाकडून दखल
गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात अल्पवयीन मुलगी व तरुणाने प्रेमप्रकरणातून पलायन केले होते. घराबाहेर पडलेली मुलगी परत न आल्याने तिचा सर्वत्र शोध घेतला मात्र ती मिळून आली नाही. तसेच तिच्या समोर राहणारा तरुणही बेपत्ता असल्याचे कळाल्यावर मुलीच्या आईने पारोळा पोलीस स्टेशनला फिर्याद दिली होती, त्यानुसार तरुणाविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल झाला होता. मुलीचा शोध लागत नसल्याने आईने पोलीस महासंचालकांची भेट घेतली. महासंचालकांनी अधीक्षक डॉ. उगले यांना सुचना केल्या. त्यानुसार उगले यांनी गंभीर प्रकरणाची दखल घेत त्याबाबत तातडीने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षकांना सुचना दिल्या होत्या.

या पथकाने लावला दोघांचा छडा
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक बापू रोहम यांनी हवालदार शरद भालेराव, रामकृष्ण पाटील, विजय पाटील, नरेंद्र वारुळे व पल्लवी मोरे यांचे पथक तयार केले. नरेंद्र वारुळे व विजय पाटील यांनी पथकाला दोघांच्या लोकेशनबाबत तांत्रिक माहिती पुरविली त्यानुसार पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील दापोडी शिवारातून दोघांना ताब्यात घेण्यात आले. आम्हाला गावात नेवू नका…तेथे आमच्या जीवाला धोका आहे..अशा गयावया दोघे करीत होती. शुक्रवारी त्यांना पारोळा पोलिसात हजर केले. शनिवारी जिल्हा रुग्णालयात वैद्यकिय तपासणी केल्यानंतर पीडितेला कुटुंबाच्या ताब्यात देण्यात आले.