जळगावकर खवळले, पाकला धडा शिकविणार!

0

टॉवर चौकात पाकिस्तानच्या राष्ट्रध्वजाचे करणार दहन

जळगाव । जम्मू कश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील जम्मू-श्रीनगर महामार्गावरील अवंतीपुरा येथे दहशतवाद्यांनी गुरुवारी, केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर भीषण हल्ला केला. या हल्ल्यात 40 जवान शहीद झाले, तर 45 हून अधिक जखमी झाले आहेत. यावर जळगावात तीव्र प्रतिक्रिया उमटली असून, शुक्रवारी (दि.15) टॉवर चौकात सकाळी 11 वाजता पाकिस्तानचा राष्ट्रध्वज जाळण्यात येणार आहे.

या हल्ल्याची जबाबदारी जैश-ए-मोहम्मद या पाकिस्तानमधील दहशवादी संघटनेने स्वीकारली आहे. या हल्ल्याचा निषेध नोंदविण्यासाठी पाकिस्तानचा राष्ट्रध्वज आणि या देशाचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन टॉवर चौकात केले जाणार आहे. भाजपातर्फे जळगावकरांना उपस्थितीचे आवाहन करण्यात आले आहे, अशी माहिती पक्षाचे प्रसिध्दी प्रमुख मनोज भांडारकर यांनी दिली.