जि.प.प्राथमिक, माध्यमिक शिक्षणाधिकार्‍यांच्या बदल्या

0

जळगाव – जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षणाधिकारी भास्कर पाटील व माध्यमिक शिक्षणाधिकारी देवीदास महाजन यांच्या बदल्या झाल्या आहेत. याबाबतचे आदेश बुधवारी, जिल्हा परिषद प्रशासनाला प्राप्त झाले.
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपुष्टात आल्यानंतर प्रशासकीय बदल्यांच्या प्रक्रियेने वेग घेतला आहे. यात जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या दोन्ही अधिकार्‍यांच्या बदल्या झाल्या आहेत. भास्कर पाटील यांची बदली जळगाव जिल्हा परिषदेतच माध्यमिक शिक्षणाधिकारी म्हणून झाली आहे, तर देवीदास महाजन यांची बदली प्रतिनियुक्तीवर नाशिक महानगरपालिका शिक्षणाधिकारीपदी झाली आहे. गुरुवारी 30 रोजी, भास्कर पाटील माध्यमिक शिक्षणाधिकारी म्हणून पदभार स्वीकारणार आहेत. यासह मुंबई विभागीय मंडळाचे सहसचिव डॉ.सुभास बोरसे यांची बदली धुळे जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षणाधिकारीपदी झाली आहे.