कठुआ बलात्कार प्रकरणी आरोपींची बाजू मांडणार भाजपचे माजी मंत्री

0

श्रीनगर-कठुआमध्ये आठ वर्षांच्या मुलीवर सामूहिक बलात्कार करून तिचा खून करण्यात आला होता. संपूर्ण देशाला हादरवून सोडणारी ही घटना होती. दरम्यान कठुआ सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणात पंजाब सरकारमध्ये मंत्री राहिलेले भाजपाचे नेते आणि वकील  मोहन लाल दोन मुख्य आरोपींची बाजू मांडणार आहेत. मोहन लाल या खटल्यासाठी आरोपींकडून मोफत लढणार आहे.

मोहन लाल हे या खटल्यातील दोन मुख्य आरोपी सांझी राम आणि त्याचा मुलगा विशाल यांचा खटला लढणार आहेत. आरोपींनी माझ्याशी संपर्क केला होता, बचाव पक्षाची वकिली करण्याकडे राजकिय दृष्टीकोनातून पाहू नये, ते निरपराध आहेत हे सिद्ध करण्यासाठी मी हा खटला लढेल. कोणताही खटला लढण्यासाठी मी पैसे मागत नाही, असे मोहन लाल यांनी सांगितले आहे.