Tuesday , October 23 2018
Breaking News

भुसावळ

जामनेर येथील पत्रकारावरील भ्याड हल्ल्याचा भुसावळात निषेध

प्रांताधिकार्‍यांना निवेदन ; दोषींवर कठोर कारवाईची मागणी भुसावळ- जामनेर येथील ‘दैनिक लोकमत’चे पत्रकार लियाकतअली सैय्यद यांच्यावर चुकीची बातमी छापल्याचा आरोप करून तेथील भाजप नगरसेवक पुत्र व त्याच्या सहकार्‍यांनी लाठ्या-काठ्या व लोखंडी रॉडच्या सहाह्याने भ्याड हल्ला केल्याप्रकरणी मंगळवारी भुसावळ तालुक्यातील पत्रकारांनी घटनेचा निषेध नोंदवत प्रांताधिकारी श्रीकुमार चिंचकर यांना निवेदन दिले. आरोपींविरुद्ध …

अधिक वाचा

भाजपाचे संघटन मजबूत न झाल्यास काँग्रेससारखी अवस्था होणार

माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांच्या कानपिचक्या ; फैजपूरला रावेर विधानसभा क्षेत्राचा शक्ती केंद्रप्रमुख, बुथप्रमुखांचा मेळावा फैजपूर- सध्याच्या परीस्थितीत काँग्रेस जवळ संघटन नाही त्यामुळे भाजपचे संघटन मजबूत करणे गरजेचे आहे अन्यथा आपली सुध्दा काँग्रेस सारखी परिस्थिती व्हायला नको, अशा कानपिचक्या माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांनी येथे झालेल्या भारतीय जनता पार्टीचा रावेर …

अधिक वाचा

भुसावळकरांना दिलासा : रेल्वे बंधार्‍याचे री जॅकेटींग होणार

जलसंचयामुळे पाणीप्रश्‍नावर करता येणार मात ; आमदार सावकारेंचा पुढाकार भुसावळ- शहरात अमृत योजनेचे काम प्रगतीपथावर सुरू असताना दुसरीकडे पालिका उचल करीत असलेल्या रेल्वेच्या बंधार्‍याची जलसंचय क्षमता कमी असल्याने अनेकदा शहरवासीयांना टंचाईच्या झळा सोसाव्या लागत होत्या. यावर पर्याय रेल्वेच्या बंधार्‍याला री जॅकेटींग करून त्याची उंची एका मीटरने केल्यास पाणीप्रश्‍न सुटणार असल्याने …

अधिक वाचा

भुसावळात मोबाईल चोरी ; आरोपीला एका दिवसाची कोठडी

भुसावळ- शहरातील आठवडे बाजारातून अज्ञात चोरट्यांनी सुमारे 20 जणांचे मोबाईल लांबविल्याच्या वेगवेगळ्या घटना 21 रोजी सकाळी 11 ते 12.30 वाजे दरम्यान घडल्या होत्या तर पोलिसांनी या प्रकरणी झारखंड राज्यातील राहुल बहादुर नेमीया (21) व अन्य एका 14 वर्षीय अल्पवयीन मुलास ताब्यात घेेतले होते. संशयीतांच्या अंगझडतीत तक्रारदार प्रदीप पाटील यांचा मोबाईल …

अधिक वाचा

तामिळनाडूतील अट्टल चोरट्यांना महानगरीतील चोरी प्रकरणी अटक

भुसावळ- रेल्वेत चोरी करून बसने पसार होण्याच्या उद्देशात असलेल्या तामिळनाडूतील चौघा चोरट्यांना लोहमार्ग पोलिसांनी संशयावरून अटक केल्यानंतर त्यांच्या ताब्यातून 20 हजार रुपये किंमतीची अंगठी व 22 हजार रुपये किंमतीचा मोबाईल जप्त करण्यात आला होता. न्यायालयाने आरोपींना एक दिवसांची पोलिस कोठडी सुनावल्यानंतर त्यांना सोमवारी पुन्हा न्यायालयात हजर केले असता त्यांना दुसर्‍या …

अधिक वाचा

पारोळा उपकोषागार अधिकारी धुळे एसीबीच्या जाळ्यात

भविष्य निर्वाह निधीची रक्कम वर्ग करण्यासाठी एक हजारांची स्वीकारली लाच पारोळा- पारोळा उपकोषागार कार्यालयातील उपकोषागार अधिकारी शिवदास हंसराज नाईक (50) यांना एक हजारांची लाच घेताना धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने कार्यालयात सोमवारी दुपारी तीन वाजता अटक केली. तक्रारदाराला मंजूर झालेली भविष्य निर्वाह निधीची 80 हजारांची रक्कम वनक्षेत्रपाल यांच्या शासकीय खात्यात …

अधिक वाचा

काहुरखेड्याच्या तरुणाचा पाझर तलावात बुडाल्याने मृत्यू

भुसावळ- तालुक्यातील काहुरखेडा येथील 18 वर्षीय तरुणाचा पोहण्यासाठी गेल्यानंतर पाझर तलावात बुडाल्याने मृत्यू झाला. प्रफुल्ल अरुण वराडे (18, काहुरखेडा) असे मयत तरुणाचे नाव आहे. प्रफुल्ल सोमवारी सकाळी 11.30 वाजेच्या सुमारास पाझर तलावात पोहण्यासाठी गेला असता पाण्याचा अंदाज न आल्याने बुडाल्याने त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी वरणगाव पोलिसात काहुरखेडा पोलिस पाटील …

अधिक वाचा

सावदा येथे महसूल विभागातर्फे थकबाकी वसुली मोहीम ; अनेकांना नोटीसा

फैजपूर – सावदा येथे महसूल विभागातर्फे अकृषिक थकबाकी असणार्‍या मालमत्ता धारकांकडे शासकीय महसूल थकबाकी मोठ्या प्रमाणात बाकी असल्याने थकबाकी धारकांना महसूल विभागाने नोटीसा जारी करून त्या मालमत्तेवर लावल्या आहेत. सावदा-फैजपूर रस्त्यावरील पंजाब धाब्यावर देखील अशीच नोटीस बजाविण्यात आली असून सात दिवसात थकबाकी न भरल्यास सदर मालमत्ता सरकार जमा करण्यात येईल, …

अधिक वाचा

भाजपा-शिवसेना सरकारविरोधात यावलला राष्ट्रवादीचे धरणे आंदोलन

भाजपा सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी ; मागण्यांबाबत प्रशासनाला निवेदन यावल- भाजप-शिवसेना सरकारच्या निषेधार्थ राष्ट्रवादी कॉग्रेसच्या वतीने सोमवारी आंदोलन करण्यात आले. दुपारी 12 वाजेला राष्ट्रवादीचे पदाधिकारी, कार्यकर्ते येथील शेतकी संघात एकत्र जमले. तेथून घेषणा देेत त्यांनी तहसील कार्यालय गाठले. तहसील कार्यालयाच्या आवारातदेखील मोदी सरकारविरोधी घोषणा देण्यात आल्या. तहसीलदार कुंदन हिरे यांना विविध …

अधिक वाचा

ऑनलाईन वेश्या व्यवसायाला आळा घालण्यासह देशातील चर्चसह मिशनरी संस्थांची व्हावी चौकशी

यावलला हिंदू जनजागृती समिती व राष्ट्रीय हिंदू आंदोलनच्या वतीने तहसील प्रशासनाला निवेदन यावल- रेल्वे मंत्रालयाने कुंभ मेळ्यासाठी येणार्‍या भाविकांसाठी रेल्वे टिकीटात लावलेला अधिभार त्वरीत रद्द करावा, ऑनलाईन वेश्या व्यवसाय चालवणार्‍या संकेत स्थळावर बंदी आणावी, देशात विविध चर्चमध्ये उघडकीस आलेल्या लैगिंक शोषण व लैगिंक अत्याचाराच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर सर्वच चर्चची चौकशी करावी, …

अधिक वाचा
error: Content is protected !!