लवकरच वेट अँड वॉचची भूमिका सोडू; खा. संजय राऊत

0

मुंबई: राज्यात मुख्यमंत्रीपदावरून सत्ता संघर्ष कायं राहणार असल्याचे चीत्र सद्ध्या पाहण्यास मिळत आहे. दरम्यान भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी काल राज्यात सत्ता स्थापन न झाल्यास राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होईल असे वक्तव्य केले होते. त्यांच्या वक्तव्यावर काल केलेल्या राष्ट्रपती राजवटीची भाषा म्हणजे राज्यानं दिलेल्या जनादेशाचा अपमान असल्याचं राऊत यांनी म्हटलं. तसेच शिवसेना लवकरच वेट अँड वॉचची भूमिका सोडेल, असं सूचक विधान केले आहे.

पत्रकारांशी संवाद साधताना संजय राऊत यांनी शरद पवारांच्या भेटीवरदेखील भाष्य केले. शिवसेना, भाजपा वगळता राज्यातील इतर सर्व पक्ष एकमेकांशी संवाद साधत असल्याचं राऊत यांनी सांगितलं. पवारांची भेट दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी घेतली होती. मात्र त्यात राज्यातील राजकारणाबद्दल चर्चा झाल्याचं ते म्हणाले. आम्ही लवकरच वेट अँड वॉचची भूमिका सोडू असं म्हणत असतानाच शिवसेना अखेरच्या क्षणापर्यंत युतीधर्माचं पालन करेल हे सांगायलादेखील ते विसरले नाहीत.

गेल्या काही दिवसांपासून शिवसेना, भाजपामध्ये सत्ता वाटपावरून कलगीतुरा सुरू आहे. राज्यात 56 जागा जिंकणारी शिवसेना सत्तेच्या समान वाटपासाठी आग्रह आहे. लोकसभेवेळी ठरल्याप्रमाणे सत्तेत समान वाटा मिळावा. अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद देण्यात यावं, अशा शिवसेनेच्या मागण्या आहेत. मात्र पुढील पाच वर्ष मीच मुख्यमंत्री राहणार असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं. याशिवाय गृह, अर्थ, महसूल, नगरविकास यांच्यासारखी महत्त्वाची खाती शिवसेनेला न देण्याची भूमिका भाजपानं घेतली आहे. त्यामुळे भाजपा, शिवसेनेत जोरदार संघर्ष सुरू आहे.