LIVE अर्थसंकल्पीय अधिवेशन: दुसऱ्या दिवशीही भाजपकडून गदारोळ; गोंधळातच कामकाज सुरु !

0

मुंबई: काल सोमवारपासून महाविकास आघाडी सरकारचे पहिले अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झालेली आहे. पहिल्या दिवसापासूनच भाजप शेतकरी आणि महिलांच्या प्रश्नावरून आक्रमक असल्याचे दिसून येत आहे. सत्तेत येण्यापूर्वी सरकारने शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू, शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजाराची मदत करण्याचे आश्वासन दिले होते. आता सरकारने त्याची अंमलबजावणी करावी अशी मागणी केली आहे. त्यासाठी कालपासून सभागृहात गोंधळ सुरु केला आहे. आजही हा गोंधळ कायम आहे. सभागृहाचे कामकाज सुरु झाल्यानंतर भाजप आमदारांनी सातबारा कोरा कधी करणार?, शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजाराची मदत कधी देणार? असे प्रश्न उपस्थित करत घोषणाबाजी सुरु केली आहे. भाजप आमदारांच्या गोंधळातच कामकाज सुरु आहे.

विरोधकांनी सरकारला कर्जमाफीच्या मुद्द्यावरून घेरले आहे.