Friday , February 22 2019

भाजपाचे मंत्री, आमदाराने काय केले पाहा?

जळगावात होणार सांडपाण्याचा पुनर्वापर, सरकारकडून प्रकल्प मंजूर, 196 कोटी रुपये खर्च

जळगाव – जळगाव शहरातील सांडपाण्याचा पुनर्वापर होणे यापुढे शक्य होणार असून, सरकारने अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित मलनिस्सारण प्रकल्प अमृत योजनेंतर्गत मंजूर केला आहे. या प्रकल्पासाठी एकूण खर्च 195 कोटी 68 लाख रुपये आहे. मंजूर निधीत केंद्र सरकारचा हिस्सा 97 कोटी 84 लाख, राज्य सरकार व महापालिकेचा हिस्सा प्रत्येकी (प्रकल्प किंमतीच्या 25 टक्के) 48 कोटी 92 लाख रुपये असणार आहे. या प्रकल्पासाठी जलसंपदामंत्री गिरीश महाजन व आ. सुरेश भोळे यांनी पाठपुरावा केला होता.

अमृत योजनेंतर्गत मलनिस्सारण योजनेचे काम दीड वर्षांपासून प्रलंबित होते. योजनेच्या पहिल्या टप्प्याच्या कामासाठी जानेवारी 2018 मध्ये निविदा काढून मक्तेदाराला काम देण्यात आले होते. मात्र, शासनाने तांत्रिक त्रुटी दाखविल्याने ही निविदा रद्द करण्यात आली होती. त्यानंतर सात वेळा निविदा काढूनही प्रतिसाद मिळाला नव्हता. दरम्यान, शासनाच्या उच्चस्तरीय समितीने हे काम नवीन तंत्रज्ञानानुसार करण्याचा सूचना दिल्या होत्या. आधीच्या प्रस्तावानुसार हे काम 146 कोटी रुपये खर्चाचे होते.

आता त्यात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अंतर्भाव करण्यात आल्याने प्रकल्प किंमत वाढून 195 कोटी 68 लाख रुपये झाली आहे. यात महापालिकेच्या वाट्याचा सुमारे 49 कोटींचा हिस्सा माफ होण्यासाठी किंवा तेवढे अनुदान मिळण्यासाठी शासनाकडे प्रयत्न केले जातील. शासनाने यापूर्वीही महापालिकेला 100 कोटी रुपये अनुदानापोटी दिले आहेत, अशी माहिती आ. सुरेश भोळे यांनी ‘जनशक्ति’शी बोलताना दिली. या सुधारित प्रकल्पामुळे शहरातील सांडपाण्यावर प्रक्रिया करून हे पाणी उद्योग, शेती यासाठी विकता येणार आहे. या आधीच्या प्रकल्पात अशी तरतूद नव्हती, असेही आ. भोळे यांनी सांगितले.

Spread the love
  •  
  •  
  •  
  •  
  •  

हे देखील वाचा

भुसावळात इंग्रजीच्या पेपराला 50 विद्यार्थ्यांची दांडी

भुसावळ- बारावी परीक्षेला गुरुवारपासून प्रारंभ झाल्यानंतर पहिल्याच दिवशी इंग्रजी विषयाच्या पेपरला 50 विद्यार्थ्यांनी दांडी मारली. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: Content is protected !!