महाजनादेश यात्रा, दुसरा टप्पा २१ ऑगस्ट पासून

0

सोलापूर: राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यभरात सुरु केलेली महाजनादेश यात्रा पुन्हा २१ ऑगस्ट पासून सुरु होणार असल्याची माहिती भाजपा नेते, महाजनादेश यात्रा प्रमुख आ. सुजितसिंह ठाकूर यांनी दिली. या दुसऱ्या टप्प्याची सुरुवात नंदुरबार पासून सुरु होणार आहे. समारोप ३१ ऑगस्ट रोजी सोलापूर या ठिकणी समाप्त होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

राज्यात आलेल्या महापुरामुळे महाजनादेश यात्रा ५ दिवस उशिराने सुरु होणार आहे. दुसऱ्या टप्प्यात १४ जिल्ह्यात महाजनादेश यात्रा जाणार असून , ५५ मतदार संघात फिरणार आहे. या यात्रेत ३९ सभा, तर ५० स्वागत सभा होणार आहे. दुसऱ्या टप्प्याचा समारोप ३१ ऑगस्ट रोजी सोलापुर या ठिकाणी होणार आहे.

सांगली, कोल्हापूर, येथील पूरस्थितीमुळे ३ दिवस अगोदर हा टप्पा बंद करण्यात आला होता. पूरग्रस्त जिल्हे महाजनादेश यात्रेतून वगळण्यात आले होते. यात्रेत तीन हजार पेक्षा अधिक नागरिक आले तर रथावरून मुख्यमंत्री लोकांना मार्गदर्शन करतील अशी माहिती ठाकूर यांनी दिली आहे.