Saturday , February 23 2019
Breaking News

ठाणे

व्हॅलेन्टाइन नव्हे, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी साजरा केला पॅरेन्टाइन डे!

उल्हासनगर । जगभरात व्हॅलेन्टाइन डे उत्साहात साजरा होत असताना उल्हासनगरच्या एसएसटी महाविद्यालयाने पॅरेन्टाइन डे साजरा करून वेगळा आदर्श घालून दिला आहे. या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी पालकांचे पूजन करून आगळावेगळा पॅरेन्टाइन डे साजरा केला. या उपक्रमात 60 पेक्षा अधिक विविध उपक्रमांत अग्रेसर असलेले विद्यार्थी सामील झाले होते. 14 फेब्रुवारी हा प्रेमाचा दिवस …

अधिक वाचा

डोळ्यात अंजन घालणारी उमा जननी योजना

कल्याण । राजकारणी म्हणून आम्हाला असे वाटते, की आम्हीच लोकोपयोगी कामे करत असतो. मात्र उमा फाऊंडेशनने उमा फर्टिलिटीसारख्या खासगी रुग्णालयाच्या माध्यमातून राबवलेली ही योजना राजकारण्यांच्या डोळ्यात अंजन घालणारी आहे. निश्‍चित हे कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन कल्याण पश्‍चिमेचे आमदार नरेंद्र पवार यांनी उमा जननी योजनेच्या लोकार्पण सोहळ्यात केले. वैद्यकीय क्षेत्राकडे पाहण्याचा लोकांचा …

अधिक वाचा

अस्मिता योजना, चित्रपट पॅडमॅन अन् अंबरनाथ!

अंबरनाथ । महिलांना महिन्यातील नैसर्गिक आणि शारीरिक, मासिक पाळीच्या पाच दिवसांत चांगले आरोग्य व सुरक्षितता देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने अस्मिता योजना जाहीर केली आहे. येथील भाजप युवा मोर्चाच्या प्रदेश कार्यकारिणी सदस्या पायल कबरे यांनी अंबरनाथ येथे याच समस्येवर आधारित पॅडमॅन हा चित्रपट महिलांना आणि तरुणीला, मोफत दाखवण्याचा उपक्रम राबवून मुख्यमंत्री देवेंद्र …

अधिक वाचा

शंकराच्या पिंडीवरील दूध करताहेत भटके प्राणी, अनाथांना वाटप!

डोंबिवली । महाशिवरात्रीला डोंबिवली व आसपासच्या परिसरातील खिडकाळेश्‍वर, मानपाडेश्‍वर आणि श्री क्षेत्र पिंपळेश्‍वर महादेव मंदिरात सोमवारी रात्रीपासूनच शिवभक्तांची दर्शनासाठी गर्दी झाली होती. कल्याण-डोंबिवली परिसरातील लाखो भाविक या तीन मंदिरांमध्ये दर्शनासाठी येत असतात, तर दुसरीकडे प्राणिमात्रांसाठी कार्य करणार्‍या संस्थेने डोंबिवली आणि आसपासच्या शिवमंदिरात पिंडीवर दूध वाहण्याऐवजी हेच दूध गोळा करून भटक्या …

अधिक वाचा

ठाणेकर धनश्रीचा दिल्लीत झेंडा!

ठाणे । प्रजासत्ताकदिनी राजपथावर होणार्‍या संचलनामध्ये सहभागी होण्याची संधी मिळावी, हे स्वप्न देशभरातील लाखो एनसीसी कॅडेट्स उराशी बाळगून असतात. मात्र, विविध खडतर कॅम्पमध्ये प्रयत्नांची पराकाष्ठा केल्यानंतर त्यातील काही कॅडेट्सचे राजपथावर पाऊल ठेवण्याचे स्वप्न प्रत्यक्षात उतरते तसेच काहीसे श्रीमती सुलोचनादेवी सिंघानिया शाळेची विद्यार्थिनी धनश्री वाघमारे हिच्याबाबतीत घडले आहे. प्रजासत्ताकदिनी दिल्लीतील राजपथावर …

अधिक वाचा

प्रथमच आयोजित केलेल्या मराठा महोत्सवाला मोठ्या उत्साहात सुरुवात!

बदलापूर । बदलापूर शहरात प्रथमच सात दिवस मराठा महोत्सव 2018 चे आयोजन करण्यात आले आहे. महाशिवरात्र ते छत्रपती शिवाजी महाराज जयंती, 13 ते19 फेब्रुवारी असे सात दिवस चालणार्‍या या महोत्सवाचे मंगळवारी रात्री मोठ्या उत्साहात उद्घाटन करण्यात आले. माजीमंत्री हर्षवर्धन पाटील, कृषितज्ज्ञ बुधाजी मुळीक, नितीन चंद्रकांत देसाई, फ्लॅगमन राकेश बक्षी आणि …

अधिक वाचा

लाथ मारल्याने मेहुण्याने केला भावजीचा खून

टिटवाळा । भावजीने आईच्या पोटात लाथ मारल्याच्या रागातून भावजीच्या शरीराचे 3 तुकडे करून खुन करणार्‍या मेव्हण्यासह सासू व पत्नीला टिटवाळा पोलिसांनी अटक केली असुन. रविंद्र शिवगण (30) असे खुन करण्यात आलेल्या भावजीचे नाव आहे. ह्या खुनाच्याआरोपाखाली रवींद्रची पत्नी सुषमा (32), मेव्हणा गौतम मोहिते (29) आणि सासू अनिता मोहिते (65) अश्या …

अधिक वाचा

निवडणूक आयोगाच्या अटींमुळे उमेदवारांची धांदल

नागोठणे । नागोठणे येथील ग्रामपंचायतीची निवडणूक 25 फेब्रुवारीला होत असून उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख 10 फेब्रुवारी असल्याने निवडणूक आयोगाला अपेक्षित असणार्‍या कागदपत्रांची जमवाजमव करण्यासाठी धांदल उडाल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. त्यात उमेदवारांना पहिल्यांदाच ऑनलाइनद्वारे उमेदवारी अर्ज भरण्याची वेळ आली असल्याने या धांदलीत त्यांची आणखीनच धावपळ उडाली असल्याचे स्पष्ट …

अधिक वाचा

सिलिंडरचा स्फोट : बाल्कनी कोसळली

उल्हासनगर । बाल्कनीमध्ये ठेवलेल्या गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन सहाव्या मजल्यावरील बाल्कनी खाली कोसळून दुर्घटना घडल्याची घटना अंबरनाथमध्ये घडली असून, सुदैवाने त्यावेळी घरात कोणी नसल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. परंतु, घरातील सामानाचे मात्र मोठे नुकसान झाले आहे. अंबरनाथ पूर्वेकडील कमलाकरनगर परिसरात अंबर रेसिडेन्सी ही सात मजली इमारत आहे. या इमारतीत सहाव्या …

अधिक वाचा

फेरीवाल्यांच्या सर्वेक्षणात गैरव्यवहाराचा संशय

कल्याण । कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेला सर्वेक्षणासाठी सरकारकडून 19 लाखांचा निधी मंजूर करण्यात आला. त्यापैकी 1 लाख 84 हजारांचा निधी जमा झाला असूनही कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने फेरीवाल्यांकडून प्रत्येकी 100 रूपयांची आकारणी केली आहे. शिवाय पालिकेकडून करण्यात आलेले सर्वेक्षण आणि न्यायालयाने दिलेले आदेश यात प्रचंड तफावत आहे. त्यामुळे आतापर्यंत केलेले सर्वेक्षण रद्द करावे, अशी …

अधिक वाचा
error: Content is protected !!