मुख्यमंत्र्यांचा भुसावळ दौरा वांद्यात

0

पुनर्वसन करण्याच्या मागणीसाठी पुकारणार एल्गार, नागरिकांची माहिती

भुसावळ – शहरातील रेल्वे भागातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर रोड, आगवाली चाळ, हद्दीवाली चाळ, चांदमारी चाळ, सात नंबर पोलिस चौकी तसेच अन्य भागातील झोपडपट्टी रेल्वे प्रशासनाने हटवल्याने दलित, बौद्ध, मुस्लीम व बहुजन समाजाचे नागरिक बेघर होवून रस्त्यावर आले आहेत. त्यांचे पुनर्वसन करण्याच्या मागणीसाठी भुसावळ येथे 21 रोजी येत असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौर्‍यात एल्गार पुकारणार असल्याचा इशारा प्रसिद्धी पत्रकान्वये देण्यात आला आहे. या आंदोलनात सहभागाचे आवाहन करण्यात आले आहे.

निवेदनावर माजी नगराध्यक्ष मोहन निकम, माजी नगरसेवक जगन सोनवणे, उल्हास पगारे, विनोद सोनवणे, बाळा मोरे, रवींद्र निकम, गुला सोनवणे, राकेश बग्गन, गणेश बारसे, शेख पापा, राजू डोंगरदिवे, गणेश सपकाळे, विनोद निकम, संदीप सपकाळे, रवी सपकाळे, अहमद कुरेशी, सैफुभाई, अनिता खरारे, साधना भालेराव, मथुराबाई पवार, एम.आर.तायडे, जी.बी.सोनवणे, योगेश तायडे, बाळा पवार, माया मोरे, भरत परदेशी, भगवान मेढे, सीमा वानखेडे, छोटू निकम, संतोष मेश्राम, बबलू सिद्दीकी, संगीता ब्राह्मणे, सुधीर जोहरे, आरीफ शेख, महेंद्र पाटील, गोपी साळी, आनंद सुरवाडे, संतोष साळवे, विलास खरात, शैलेश अहिरे, रहिम कुरेशी, पापा इम्रान खान आदींची नावे आहेत.