ट्रान्सफॉर्मरच्या स्फोटात दोन जण जखमी

0 1

पुणे :- खराडीतील झेन्सार कंपनीजवळ रस्त्यावर महावितरणच्या ट्रान्सफॉर्मरचा स्फोट झाला. या स्फोटात ट्रान्सफॉर्मर शेजारी उभ्या असलेल्या दोन व्यक्ती गंभीररीत्या भाजल्या गेले आहेत. दरम्यान तेथे जमलेल्या नागरिकांनी या दोघांना तातडीने रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. ही घटना आज (शुक्रवारी) 4.45 वाजण्याच्या सुमारास घडली. या स्फोटामुळे येथील परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.