मनात कोणत्याही प्रकारचा न्युनगंड न ठेवता प्रगती करा

0

जात पडताळणी आयुक्त गोरक्ष गाडीलकर यांचे प्रतिपादन : एचआयव्ही ग्रस्त बांधवांना दिवाळीनिमित्ताने नवीन ड्रेस, दिवाळी फराळाचे वाटप

जळगाव– परमेश्वराने आपल्याला जे आयुष्य दिले आहे ते आपण आनंदाने जगले पाहिजे.आणि कोणत्याही परिस्थितीत आपला परमेश्वरावरील विश्वास कमी होऊ देऊ नका.मनात कोणत्याही प्रकारचा न्यूनगंड न बाळगता चांगले आयुष्य जगा आणि काहीही सहकार्य लागल्यास आम्ही सदैव आपल्या पाठीशी आहोत. दिवाळी हा सण दीपकांचा सण आहे. आपल्या सर्वांच्या आयुष्यात ही दिवाळी नाव चैतन्य घेऊन येईल. असे प्रतिपादन जात पडताळणी आयुक्त गोरक्ष गाडीलकर यांनी केले.

सर्वतोपरी मदतीसाठी आम्ही पाठीशी

रोटरी क्लब जळगाव मिडटाऊन, इंडियन रेडक्रॉस सोसायटी जिल्हा शाखा आणि सामनेर येथील जाणीव बहूद्देशीय संस्था सामनेर यांच्या संयुक्त विद्यमाने एचआयव्ही ग्रस्त बालकांना नवीन ड्रेस आणि दिवाळी फराळचे वाटप करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. प्रास्ताविकात जाणीव बहूद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा मनीषा बागूल यांनी की, एचआयव्ही ग्रस्त बालक आणि त्यांचे परिवार यांना ही दिवाळीचा आनंद घेता यावा या प्रमुख उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याचे म्हणाले. समाजातील रोटरी क्लब, रेडक्रॉस, सारख्या दानशूर संस्थाचे सहकार्य मिळत आहे. रोटरी क्लब जळगाव मिडटाऊनच्या अध्यक्ष डॉ. उषा शर्मा यांनीही शुभेच्छा देत सांगितले की रोटरी क्लब सदैव आपल्या सहकार्यासाठी तयार आहे. सर्वतोपरी मदत गरजेनुसार आपल्याला करण्यात येईल. आणि प्रत्येक दिवाळी आम्ही आपणसोबत साजरा करण्याचा पूर्ण प्रयत्न करू, असे सांगितले. सूत्रसंचालन आणि आभार रेडक्रॉसच्या जनसंपर्क अधिकारी सौ उज्वला वर्मा यांनी केले.

या मान्यवरांतर्फे मिळाली मदत

या सर्व बालकांसाठी रोटरी क्लब मिड टाऊनचे सदस्य आणि विश्वनाथ आर. पाटील ज्वेलर्सचे संचालक मनोज पाटील यांनी मुलांना नवीन ड्रेस, रेडक्रॉसचे उपाध्यक्ष गनी मेमन यांनी नमकीन व मिठाईचे बॉक्स आणि रेडक्रॉसच्या वतीने थ्रेप्तिन बिस्किटचे डब्बे देण्यात आले. यशस्वितेसाठी रोटरी क्लब जळगाव मिडटाऊनच्या अध्यक्ष डॉ. उषा शर्मा, डॉ, अपर्णा मकासरे, डॉ. रेखा महाजन व सर्व रोटरी सदस्य, विश्वनाथ आर. पाटील ज्वेलर्सचे मनोज पाटील आणि त्यांचा संपूर्ण परिवार, रेडक्रॉसचे उपाध्यक्ष गनी मेमन, मानद सचिव विनोद बियाणी, वैशाली कुर्‍हाडे, जाणीव बहूद्देशीय संस्थेचे सचिव प्रवीण पाटील, कोषाध्यक्ष शलिनी पगारे, लिना पवार यांनी परिश्रम घेतले.