आसाम घुसखोर:आज ममता बॅनर्जी घेणार राजनाथसिंगांची भेट

0

आसाम-आसाममधील ४० लाख नागरिक घुसखोर असल्याची माहिती रजिस्टर ऑफ सिटिझन राष्ट्रीय नागरिक नोंदणी पुस्तिकेत काळ जाहीर करण्यात आले. यावर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारवर सडकून टीका केली आहे. याप्रकरणी ममता बॅनर्जी आज गृहमंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेणार आहेत.

ज्येष्ठ वकील राम जेठमलानी यांच्या घरी जाऊन ममता बॅनर्जी भाजपाचे नेते यशवंत सिन्हा आणि खासदार शत्रुघ्न सिन्हा यांच्यासोबतही यासंदर्भात चर्चा करणार आहेत. याशिवाय तृणमुल काँग्रेसच्या खासदारांचे प्रतिनिधिमंडळ दोन ऑगस्ट रोजी आसामला जाणार आहेत. आसाममधील राष्ट्रीय नागरिक नोंदणीचा (एनआरसी) अंतिम मसुदा सोमवारी जाहीर झाला.

आकडेवारीनुसार आसामातील २ कोटी ८९ लाख नागरिकांचे नागरिकत्व कायदेशीर ठरले असून, विविध कारणांमुळे ४० लाख नागरिकांना या अहवालात स्थान मिळालेले नाही. त्यामुळे हे ४० लाख नागरिक बेघर होण्याची शक्यता आहे. यापूर्वी ममता बॅनर्जी यांनी भाजपा सरकारने आडनाव पाहून ही यादी तयार केली असल्याची टीका केली होती.ज्यांच्याजवळ आधार कार्ड आणि पासपोर्ट आहे अशांचीही नावे या यादीत समाविष्ट करण्यात आलेली नाहीत असाही आरोप ममता बॅनर्जी यांनी केला. अनेक लोकांची आडनावे पाहून ड्राफ्टमधून त्यांची नावे हटवण्यात आल्याचा गंभीर आरोपही ममता बॅनर्जींनी केला. भाजपा सरकारला काही लोकांना बळजबरीने बाहेर काढायचे आहे. त्याचमुळे अशा लोकांना बाहेर काढण्यासाठी हा कट रचण्यात आला आहे. देशातल्याच लोकांना त्यांच्याच देशात शरणार्थी बनवले जाते आहे दुर्दैवी आहे असेही ममता बॅनर्जींनी म्हटले आहे.