मराठा आंदोलनाची पुढी दिशा आजच्या बैठकीत ठरणार

0 2

पुणे-मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रमक झालेल्या मराठा समाजाच्या आंदोलनाची पुढची नेमकी दिशा ठरविण्यासाठी आज मराठा आरक्षण परिषदेने पुण्यात बैठक आयोजित केली आहे. आज दुपारी १ ते ४ या दरम्यान बैठक पार पडणार आहे. या बैठकीसाठी मराठा समाजातील मान्यवर समन्वयक, संशोधक, तज्ञ, अभ्यासक तसेच खासदार उदयनराजे भोसले उपस्थित राहणार आहेत.

या बैठकीत मराठा समाजाची आंदोलनाची पुढची दिशा काय असेल याबाबत निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभरात मराठा समाजाचे आंदोलन सुरूच आहे. आज धुळ्यात खासदार सुभाष भामरे यांच्या घरासमोर आंदोलन करण्यात येणार आहे. तर, पालघरमध्येही धरणे आंदोलन होणार आहे.दुसरीकडे परळीत सुरू असलेल्या ठिय्या आंदोलनाचा आज १९ वा दिवस आहे.

दरम्यान आरक्षणाच्या मागणीवर चर्चा करण्यासाठी राज्यातही विविध बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबईतही घाटकोपरच्या शिवाजी महाराज मैदानात बैठकी घेण्यात येणार आहे. 9 ऑगस्टला नियोजित असलेल्या आंदोलनाबाबत नियोजन करण्यासाठी मुंबईत मराठा संघटनांची बैठक होणार आहे.