अल्पवयीन मुलीवर बलात्कारास फाशी

0

नवी दिल्ली-अल्पवयीन मुलींवरील बलात्काराच्या गुन्ह्य़ात दोषींना ठरलेल्या आरोपीला थेट फाशीच्या शिक्षेची तरतूद करणारे विधेयक लोकसभेत मंजूर झाले. कायद्यामध्ये सज्ञान स्त्रीवरील बलात्कारासाठी शिक्षेची तरतूद असली तरी १२ किंवा १६ वर्षांखालील मुलींवरील बलात्कारासाठी कठोर शिक्षेची तरतूद नव्हती. ती उणीव भरून काढून गुन्हेगारांवर वचक बसावा या हेतूने हे विधेयक संमत करण्यात आले.

या विधेयकानुसार १६ वर्षांखालील मुलीवरील बलात्कारासाठी किमान शिक्षेची तरतूद १० वर्षांवरून २० वर्षे इतकी वाढवण्यात आली आहे. तसेच ती दोषीच्या उर्वरित आयुष्यभरासाठी लागू करता येऊ शकते. १६ वर्षांखालील मुलीवरील सामूहिक बलात्काराबद्दल आजन्म कारावासाची शिक्षा असेल. १२ वर्षांखालील मुलीवरील बलात्कारासाठी किमान शिक्षेची तरतूद २० वर्षे केली असून सामूहिक बलात्कारासाठी देहदंडाची शिक्षा असेल.