निकाल पाहून मोदी म्हणाले, ‘विजयी भारत’ !

0 1

नवी दिल्ली: १७ व्या लोकसभा निवडणुकीची मतमोजणी सुरु आहे. देशभरात पुन्हा भाजपची सत्ता येताना दिसत आहे. जवळपास ३५० जागांवर भाजप आणि एनडीए आघाडीवर आहे. एनडीएचा विजय पाहता मोदींनी ट्वीट करत सबका साथ + सबका विकास + सबका विश्वास= विजयी भारत असे ट्वीट करत मोदींनी मतदारांचे आभार मानले आहे.

सकाळपासून देशात मतमोजणी सुरु आहे. पुन्हा देशात २०१४ ची पुनरावृत्ती होताना दिसत असून एकदा पुन्हा मोदी पंतप्रधान होणार हे निश्चित आहे. यानंतर मोदींनी ट्वीट करत आभार मानले आहे.