MPSC उमेदवारांना प्रोफाईल तातडीने आधार कार्डशी लिंक करावे लागणार

0

मुंबई: राज्य लोकसेवा आयोग अर्थात एमपीएससीची परीक्षा देणाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची सूचना आहे. ज्या उमेदवारांनी आपल्या प्रोफाईलमध्ये आधार क्रमांक नमूद केला नसेल, किंवा आपलं प्रोफाईल आधार क्रमांकाशी जोडलं नसेल, त्यांनी तातडीने जोडून घ्यावं. त्यासाठी 31 मेपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. अन्यथा त्यांचं प्रोफाईल 1 जून 2018 पासून निष्क्रिय (Deactivate) करण्यात येणार आहे.

आधार क्रमांकाशी न जोडणाऱ्यांचं प्रोफाईल निष्क्रिय (Deactivate) करण्यात येणार आहे. MPSC परीक्षांना बसणाऱ्या उमेदवारांची ओळख पटवण्यासाठी, आयोगाने मार्च 2017 पासून आधार कार्ड तपशील लागू केला आहे. आता या निर्णयाला वर्ष होऊन गेलं आहे. मात्र ज्यांचे जुने प्रोफाईल आहेत त्यांनी अजूनही आधार कार्डचे तपशील अपडेट केले नाहीत. त्यामुळे आता आयोगाने थेट असे प्रोफाईल डिअॅक्टिव्हेट करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रोफाईल निष्क्रिय केल्यानंतर संबंधित उमेदवार लॉग इन करुन प्रोफाईल पाहू शकेल, पण त्याला त्या प्रोफाईलवरुन कोणतेही अर्ज करु शकणार नाही.