मुंबई, ठाण्यात महायुतीचा बोलबाला

0

मुंबई: राज्यात लागलेल्या विधानसभा निवडणुकीत मुंबई, ठाण्यात सेना, भाजपा नी आपला गड शाबूत ठेवला आहे. ठाकरे घराण्यातील पहिला उमेदवार वरळी मतदारसंघातून विजयी झाले असून, आदित्य यांनी अभिजीत बिचुकले यांचा दारुण पराभव केला आहे. तर नवी मुंबईतील ऐरोली विधानसभा मतदारसंघातून गणेश नाईक विजयी झाले आहेत. पालघरमधून शिवसेनेचे उमेदवार श्रीनिवास वनगा विजयी. वांद्रे पश्चिममधून आशिष शेलार विजयी. मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे.

ठाण्यात शिवसेनेने आपला गड राखला असून ओवळा-माजीपाडामधून शिवसेनेचे प्रताप सरनाईक आणि कोपरी-पाचपाखाडीमधून एकनाथ शिंदे विजयी झाले आहेत. घाटकोपर पूर्वमधून भाजपाचे पराग शाह विजयी झाले आहेत. भाजपाने यावेळी प्रकाश मेहता यांचे तिकीट कापून पराग शाह यांना उमेदवारी दिली होती. बोरीवलीतून भाजपाचे सुनील राणे विजयी, बोरीवली विधानसभा मतदारसंघातून भाजपाचे सुनील राणे विजयी झाले आहेत. ते वरळीमध्ये राहतात. पण भाजपाने विनोद तावडे यांच्याजागी त्यांना उमेदवारी दिली होती. विनोद तावडे बोरीवलीमधून आमदार होते. पण भाजपाने त्यांचे तिकीट कापले व सुनील राणे यांना उमेदवारी दिली.

मुंबईच्या या मतदारसंघात काँग्रेस-राष्ट्रवादीला आघाडी
मुंबईत शिवसेना-भाजपा युतीने बहुतांश मतदारसंघात मोठी आघाडी घेतलेली आहे. चार ते पाच मतदारसंघांचा अपवाद वगळता आघाडीला फारसे यश मिळताना दिसत नाहीय. मुंबईच्या या मतदारसंघात काँग्रेस-राष्ट्रवादीचे उमेदवार आघाडीवर आहेत. भांडूप पश्चिम – सुरेश कोपरकर (काँग्रेस)धारावी – वर्षा गायकवाड ( काँग्रेस)अणूशक्तीनगर – नवाब मलिक ( राष्ट्रवादी काँग्रेस)मालाड पश्चिम – अस्लम शेख ( काँग्रेस)मानखुर्द शिवाजीनगर – अबू आझमी (समाजवादी पक्ष)