Sunday , September 23 2018
Breaking News

राष्ट्रीय

यूपीए सरकारनेच रिलायन्सशी बोलणी केल्याचे पुरावे : रविशंकर प्रसाद

दिल्ली :राफेल करारावरून टीका करताना काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधानांना चोर म्हटले. तसेच फ्रान्सने दिलेल्या अधिकृत स्पष्टीकरणाचाही संदर्भ त्याला जोडला आणि ओलांद यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चोर म्हटले आहे असा दावा राहुल गांधी यांनी केला. देशाच्या पंतप्रधानाबाबत एकाही पक्षाच्या अध्यक्षाने कधीही अशाप्रकारे शब्द वापरून इतक्या खालच्या पातळीची टीका …

अधिक वाचा

नरेंद्र मोदी यांनी अनिल अंबानी यांच्या कंपनीला दिले ३० हजार कोटींचं ‘गिफ्ट’

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा आरोप नवी दिल्ली : राफेल कराराच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्योगपती अनिल अंबानी यांच्या कंपनीला ३० हजार कोटींचं गिफ्ट दिले असल्याचा गंभीर आरोप काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत केला. त्याआधी राहुल यांनी ट्विटरच्या माध्यमातूनही पंतप्रधानांवर जोरदार टीका केली होती. फ्रान्सचे …

अधिक वाचा

राफेल खरेदीच्या माध्यमातून सैन्यावर सर्जिकल स्ट्राइक – राहुल गांधी

नवी दिल्ली : सर्जिकल स्ट्राइक दिन महाविद्यालयांमध्ये साजरा करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयावरून वाद निर्माण झाले असतानाच काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. राफेल खरेदीच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सैन्यावर १ लाख ३० हजार कोटींचा सर्जिकल स्ट्राइक केला आहे असा गंभीर आरोप राहुल यांनी केला. राहुल …

अधिक वाचा

कोणालाही सिद्ध करुन दाखवण्याची गरज नाही :रविंद्र जाडेजा

दुबई:प्रदीर्घ कालावधीनंतर भारताच्या वन-डे संघात पदार्पण करणाऱ्या रविंद्र जाडेजाने पहिल्याच सामन्यात ४ बळी घेऊन आपण फॉर्मात असल्याचं दाखवून दिलं आहे. या कामगिरीसाठी जाडेजाला सामनावीराचा किताब देऊनही गौरवण्यात आलं. हा किताब स्विकारत असताना, रविंद्र जाडेजाने आपल्याला कोणालाही काहीही सिद्ध करुन दाखवण्याची गरज नसल्याचं म्हटलं आहे. हे पुनरागमन माझ्या नेहमी लक्षात राहिलं, कारण …

अधिक वाचा

आता गॅसही महागणार?

नवी दिल्ली : डॉलरच्या तुलनेत रुपया घसरत असल्याचा परिणाम इंधनाच्या दरावर होऊ लागला आहे. पेट्रोल  व डिझेलच्या सतत होणाऱ्या दरवाढीनंतर वाहनांसाठी लागणारा गॅस सीएनजी व घरगुती वापराचा गॅस (पीएनजी) यांच्या किमतीही वाढण्याची शक्यता आहे. घरगुती गॅसची किंमत आॅक्टोबरमध्ये वाढवण्यात येईल, असे सांगण्यात येत आहे. याचाच अर्थ सणासुदीच्या काळात गॅससाठी जादा …

अधिक वाचा

आशिया कपमध्ये पंड्यासह ठाकूर आणि पटेल यांना विश्रांती; चाहरला संधी

दुबई : आशिया कप क्रिकेट स्पर्धेत भारत – पाकिस्तान यांच्यात झालेल्या सामन्यात जखमी झालेल्या हार्दिक पंड्याला विश्रांती देण्यात आली आहे. हार्दिक पंड्यासह शार्दुल ठाकूर आणि अक्षर पटेल यांनाही विश्रांती देण्यात आली आहे. तर पंड्याच्या जागी दीपक चाहरला संधी देण्यात आली असून तो दुबईत दाखल झाला आहे. बुधवारी भारत – पाकिस्तान …

अधिक वाचा

मोदी सरकारची गुंतवणूकदारांसाठी शुभवार्ता

नवी दिल्ली : मोदी सरकारनं लघु बचत योजनांसारख्या पब्लिक प्रोव्हिडेंट फंड (पीपीएफ), राष्ट्रीय बचत पत्र (एनएससी), सुकन्या समृद्धी योजना (एसएसवाय) तसंच पोस्ट ऑफिस टाईम डिपॉझिटच्या व्याजदरामध्ये वाढ करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. बदललेले व्याजदर 1 ऑक्टोबर 2018 पासून 31 डिसेंबर 2018 पर्यंत लागू राहतील. निश्चित मिळकतीच्या बचत योजनांमध्ये गुंतवणूक करणाऱ्या …

अधिक वाचा

उत्तराखंडमध्ये गायीला ‘राष्ट्रमाते’चा दर्जा ; विधेयक मंजूर

डेहराडून : उत्तराखंडमध्ये गायीला राष्ट्रमातेचा दर्जा देणारं विधेयक उत्तराखंडच्या विधानसभेत मंजूर करण्यात आलं आहे. हे विधेयक आता केंद्राच्या मंजुरीसाठी पाठवण्यात येणार आहे. सत्ताधारी आणि विरोधक दोघांनाही गायीचं महत्त्व माहीत आहे. केवळ भारतातच नव्हे तर इतर देशातही गायीला खूप महत्त्व आहे. त्यामुळेच गायीला राष्ट्रमातेचा दर्जा देण्यात आल्याचं उत्तराखंडच्या पशूपालन मंत्री रेखा …

अधिक वाचा

पाकिस्तानवर मिळवलेल्या विजयासाठी अमेरिकेला आनंद ; भारताला शुभेच्छा

मुंबई : आशिया चषक स्पर्धेच्या दुसऱ्या सामन्यात भारताने पाकिस्तानवर 8 विकेट्सने दणदणीत विजय मिळवला. संपूर्ण जगातील क्रिकेट चाहत्यांचं भारत-पाकिस्तान मध्ये होणाऱ्या या सामन्यावर लक्ष होतं. पाकिस्तानवर मिळवलेल्या या विजयावर भारतालाच नाही तर अमेरिकेला देखील आनंद झाला आहे. अमेरिकेचे भारतातील राजदूत केन जस्टर यांनी भारताला विजयाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी ट्विट …

अधिक वाचा

मोदी सरकार हे हुकूमशाहीचं सरकार – राहुल गांधी

नवी दिल्ली : केंद्रातील मोदी सरकार हे हुकूमशाहीचं सरकार असल्याचा घणाघाती आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. छत्तीसगडमध्ये पोलिसांनी कॉंग्रेस कार्यकर्त्यांना मारहाण केल्याच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी बोलत होते. कॉंग्रेस कार्यकर्त्यांना मारहाण करतानाचा व्हिडिओ ट्विट करत राहुल यांनी म्हटले आहे की, नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात हुकूमशाही ही भाजपची वृत्ती होत चालली आहे. …

अधिक वाचा
error: Content is protected !!