जिल्हा बँक भरती मुलाखतीचे छायाचित्रीकरण व्हावे : देवेंद्र मराठे

0

स्थानिक भूमिपुत्रांना भरती मध्ये प्राधान्य मिळावे

जळगाव : नुकतीच जिल्हा बँक भरती गुणवत्ता यादी प्रकाशित करण्यात आली. परंतु यादीमध्ये गुण दाखवण्यात आलेले नाही. भरती प्रक्रियेच्या मुलाखती घेण्यात येणार आहे. या मुलाखतीचे चायाचीत्रीकरण करण्याची मागणी एन. एस. यु. आय. तर्फे जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांचे नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांना निवेदन देण्यात आले. जिल्हा बँक भरती प्रक्रियेत मुलाखती या स्थानिक कमिटीने जर मुलाखती घेतल्या तर मोठा गैरव्यवहार होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच भरती करतांना स्थानिक भूमीपुत्रांना न्याय देण्याची मागणी करण्यात आली आहे.

भरतीसाठी १५ ते १७ लाख रेट
जिल्हा बँकेत रिक्त असलेल्या ४९० पदांपैकी २२० पदे सरळ सेवेने व ऑनलाईन पद्धतीने भरण्यास परवानगी दिली आहे.परंतु एका खाजगी कंपनी मार्फत ऑनलाईन परीक्षा गेल्या वर्षी घेण्यात आली. भरतीसाठी १५ ते १७ लाखाचा रेट फुटला असून मुलाखती दरम्यान या गैरसंबंधाची शक्यता जास्त आहे. झालेली परीक्षा व मुलाखती या प्रशासक नेमणूक त्यांच्या मार्फत पारदर्शक पद्धतीने करण्याची मागणी केली आहे.

यांची होती उपस्थिती
निवेदन देतांना शाम तायडे, नदीम काझी, ज्ञानेश्वर कोळी, प्रदीप सोनवणे, अमजद पठाण, जाकीर बागवान, मनोज सोनवणे, जगदीश गाढे, मुजीब पटेल, बाबा देशमुख, जमील शेख, योगेश देशमुख, उद्धव वाणी, शफी बागवान, दिपक सोनवणे, शोएब पटेल, मनोज चौधरी, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.