सोलापूर: सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी ओबीसी संघटनेचे नेते शंकरराव लिंगे यांना पोलिसांसमोर काळं फासले आहे. हा प्रकार सोलापूरमध्ये घडला. मराठा आरक्षणासंदर्भात सुनावणीसाठी राज्य ओबीसी आयोगाला भेटण्यासाठी शंकरराव लिंगे सोलापुरात आलेले होते. त्या दरम्यान शासकीय विश्रामगृहाच्या परिसरात हा प्रकार घडला. लिंगे हे ओबीसी आयोगाला निवेदन देण्यासाठी आलेले होते.
ADVERTISEMENT
सकल मराठा समाजाचे प्रतिनिधी आणि भाजप जिल्हाध्यक्ष शहाजी पवारही घटनास्थळी उपस्थित होते. राज्या ओबीसी आयोगाला भेटण्यास आलेले शंकरराव लिंगे आणि अॅड राजन दिक्षीत याना सकल मराठा समाज्या काही कार्यकर्त्यानी धक्काबुक्की करून काळे फासण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे.