मोदींच्या परदेश दौऱ्यातून भारताला मिळाले खूप काही…

0

नवी दिल्ली-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर ४८ महिन्यात ५२ देशांचा दौरा केला. यासाठी तब्बल ३५५ कोटींचा खर्च आल्याची माहिती माहिती अधिकारातून समोर आली आहे. यावरून विरोधी पक्ष पंतप्रधान व सरकारला लक्ष करून टीका करीत आहे. हे जरी सत्य असले तरी सकारात्मक विचार केल्यास  मोदींनी केलेल्या परदेश दौरातून भारताला खूप काही मिळाले आहे हे देखील तितकेच सत्य आहे. मोदींनी भारताचे आंतरराष्ट्रीय संबंध दृढ करण्याचा प्रयत्न केला आहे.

पाहूया मोदींच्या परदेश दौऱ्याचे फलित
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपाप्रणित रालोआ सरकारला सत्तेत येऊन आता चार वर्षे झाली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी सुरुवातीच्या काही काळापासून सतत परदेश दौरे करणारे नेते म्हणूण ओळखले जातात. मात्र त्यांच्या या दौऱ्यांमुळे भारताचे शेजारील व इतर काही महत्त्वांच्या देशांशी संबंध दृढ झाले आहेत. भारताचा सांस्कृतिक प्रभाव जगभरात प्रसारित होण्यासाठीही त्याचा फायदा झाला आहे.

रखडलेले करार पूर्ण केले 

पाकिस्तान वगळता गेल्या चार वर्षांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विशेष दौरे करुन विविध करार व समस्या तडीस लावल्या आहेत. अफगाणिभूमीत नरेंद्र मोदीनी, भारताने बांधून दिलेल्या भव्य धरणाचे उद्घाटन केले. भूतानच्या संसदेत भाषण, नेपाळमधील विविध प्रकल्पांची पायाभरणी यामुळे आपल्या हिमालयातील मित्रदेशांशी मोदी यांनी संबंध वाढवले. गेली चाळीस वर्षे भारत आणि बांगलादेश यांच्यामधील रखडलेला भूसीमा करार मोदी यांच्या कार्यकाळात पूर्ण केला गेला हे शेजारील देशांच्या बाबतीतील मोठे यश म्हणावे लागेल.

विविध करार

इस्रायलशी भारताचे संबंध गेली ७० वर्षे आहेत व मुत्सद्दी पातळीवर संबंध प्रस्थापित होऊन २६ वर्षे झाली आहेत. मात्र भारताने याबाबत फारशी खुली भूमिका ठेवली नव्हती. वाजपेयी यांच्या काळात इस्रायलचे तत्कालीन पंतप्रधान अरायल शेरॉन यांनी भेट देऊन संबंधाचा पाया रचला होता. त्यावर नरेंद्र मोदी व बेंजामिन नेतान्याहू यांनी दोन्ही देशांच्या मैत्रीला पुढे नेण्याचे काम केले. दोन्ही नेत्यांनी एकमेकांच्या देशांना भेट दिली आणि विविध करारांवर स्वाक्षर्याही केल्या.

पॅलेस्टाइनबाबतचा भ्रम दूर केला
भारताच्या इस्रायलच्या वाढत्या मैत्रीने एक नवा पेच तयार झाला तो म्हणजे पँलेस्टाइन संबंधात आलेला अडथळा. नरेंद्र मोदी यांनी इस्रायलभेटीवर असताना पॅलेस्टाइनला जाणे टाळल्याने टीकाकारांचे सूर अधिकच तीव्र झाले. मात्र मोदी यांनी पॅलेस्टाइनचा स्वतंत्र दौरा करुन या शंकाकुशंका दूर केल्या व भारताने पॅलेस्टाइनची उपेक्षा केलेली नाही हे सिद्ध केले. या पँलेस्टाइन दौर्यात मोदी यांनी जॉर्डन व ओमान दौराही केला. चीनमध्ये केलेल्या सलग दौऱ्यांमध्ये व चीनचे अध्यक्ष शी. जिनपिंग यांच्या भारतभेटींमुळे दोन्ही देशांतील तणावपूर्व वातावरणाही चर्चेचा पर्याय खुला राहिला.

भारतीय समुदायांशी चर्चा

ब्रिटीश आणि अमेरिकन खासदारांसमोरील भाषणाांबरोबरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ऑस्ट्रेलिया, अफागाणिस्तान, भूतान, माॅरिशस अशा देशांच्या संसदेत भाषण करण्याची  संधी मिळाली. कदाचित अशी अनेक संसदसभांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळवणारे ते पहिले भारतीय पंतप्रधान असावेत. याबरोबरच पंतप्रधान मोदी यांनी सुरुवातीपासूनच प्रत्येक देशामध्ये गेल्यावर तेथील भारतीय समुदायाशी संवाद सुरु ठेवला. कदाचित त्याचा त्यांच्या प्रतिमा संवर्धनासाठी फायदा झाला असावा. पंतप्रधान मोदी यांनी माॅरिशस, सेशेल्स अशा चिमुकल्या पण राजकीयदृष्ट्या महत्व असणाऱ्या देशांनाही भेट दिली.

अणू पुरवठासाठी पाठिंबा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ५-१० जुन २०१८च्या पाच देशांच्या दौर्‍यामागे मुख्य उद्देश होता तो अणू पुरवठादार गटामध्ये (न्युक्लिअर सब्स्क्रायबर्स ग्रुप किंवा एनएसजी) भारताला प्रवेश मिळवून देण्यासाठी त्यातील सदस्य देशांचा पाठिंबा मिळविण्याचा प्रयत्न केला. पाचपैकी तीन देश एनएसजीचे सदस्य आहेत.

अफगाणिस्तानात विकासकार्याद्वारे भारताचा ठसा

इराण मधिल चाबाहार बंदर भारताने विकसित केले व त्याचा व्यापारी वापर सुरू केला की, त्या आखाती मार्गावर भारताचीही करडी नजर असणार आहे. भारतासाठी अफगाणिस्तान व पुढे उझबेगीस्तान-कझागस्तान रशियामार्गे युरोपात पोहोचण्याचा मार्ग सुकर होणार आहे. इराणच्या सीमेपर्यंत अफगाणिस्तानचा महामार्ग भारताने आधीच बांधून काढला आहे.तोही महामार्ग पाकच्या बलुचिस्तान सीमेला समांतर जाणारा आहे. थोडक्यात, भारताला हे बंदर व्यापाराइतकेच लष्करी रणनीतीमध्येही उपयुक्त ठरणार आहे.

पाकिस्थानला एकाकी पाडले
पाकिस्तानचा प्रभाव अफगाणिस्तानच्या पश्तून समाजापर्यंत मर्यादित आहे. हिंदुकुश पर्वतरांगेच्या उत्तर भागात ताजीक, उझबेग, हजारा आदी इतर गैर-पश्तून समाज पाकिस्तानचा आणि तालिबानचा विरोध करतात. सलमा धरण आणि विद्युत प्रकल्प, झरांज-देलाराम महामार्ग आणि शेजारच्या इराणमध्ये चाबहार बंदराचा विकास आदी विकासकार्याद्वारे भारताने या देशांत स्वतःचा ठसा उमटविला आहे. याद्वारे भारताला अफगाणिस्तानच्या बिन-पश्तून भागात प्रभाव वाढवण्याच्या प्रयत्नात यश मिळत आहे; तसेच पाकिस्तान एकाकी पडत आहे.

भेट -गुंतवणुकीच्या फायदा
कतार या इंधनसमृद्ध देशाच्या आपल्या दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी मोदी यांनी कतारच्या प्रमुख उद्योगपतींबरोबर एक तास चर्चा केली. या वेळी त्यांनी भारतात व्यवसायवृद्धीसाठी आपल्या सरकारद्वारा गेल्या दोन वर्षांत राबविण्यात आलेल्या धोरणांची माहिती दिली.अनुकूल धोरणांवर भर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कतारच्या कंपन्यांना प्रामुख्याने पायाभूत सुविधा क्षेत्रातील उपलब्ध व्यवसायाच्या संधींचा फायदा उठविण्याचे आमंत्रण दिले. या कंपन्यांनी नमूद केलेले अडथळे दूर करण्याचे आश्‍वासनही मोदी यांनी दिले.

व्यापार वाढ

कतारचे उद्योगपती पायाभूत सुविधांसह रेल्वे, कृषी आणि सौरऊर्जेच्या क्षेत्रात गुंतवणूक करू शकतात. मोदी यांनी दोन्ही देशांमधील व्यापाराला चालना देण्यातील कतारचे अमीर शेख तमीम बिन हमाद थानी यांच्या भूमिकेची स्तुती केली. दोन्ही देशांमधील द्विपक्षीय व्यापार 2014-15मध्ये 15.67 अब्ज डॉलर होते. यामध्ये भारताची निर्यात सुमारे एक अब्ज डॉलर होती.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कतारचे आमीर शेख तमिम बिन हमाद अल थानी यांच्यादरम्यान झालेल्या चर्चेनंतर भारत आणि कतार यांच्यात राष्ट्रीय गुंतवणूक आणि पायाभूत सुविधा निधीसह सात करारांवर सह्या झाल्या. यामध्ये आरोग्य, सहकार्य, पर्यटन, कौशल्य विकास, सीमा शुल्कात परस्पर सहकार्य, तसेच युवक आणि क्रीडा यांचा समावेश आहे.

भारताला स्वित्झर्लंडचा पाठिंबा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ०६ जुनला स्वित्झर्लंडचे अध्यक्ष युहान स्नायडर अमन यांची भेट घेतली. स्वित्झर्लंडने 48 देशांच्‍या न्युक्लियर सप्लायर ग्रुप भारताच्‍या मेंबरशिपसाठी समर्थन दिले आहे.करचुकवेगिरी आणि भ्रष्टाचार या दोन्ही क्षेत्रातही भारताला पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन स्वित्झर्लंडने दिले आहे. करचुकवेगिरीसाठी भारतीयांकडून स्वीस बॅंकेत ठेवण्यात येणाऱ्या काळ्या पैशांवरही यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये सविस्तर चर्चा झाली.भारताला स्विस बँकांमध्‍ये इंडियन अकाउंट होल्डर्सची माहिती मिळु शकते. त्याचबरोबर व्यापार, गुंतवणूक या क्षेत्रातही दोन्ही देशांनी परस्परांना सहकार्य करण्याचे निश्चित केले.

भारत-अमेरिका मैत्रीच्या अध्यायाचे नवे पर्व
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेतील संसदेला संबोधित करताना लोकशाहीवर नितांत श्रद्धा असणार्‍या वॉल्ट व्हिटमन या अमेरिकन कवीच्या कवितेच्या ओळी उद्धृत केल्या. त्या औचित्यपूर्ण, बोलक्या म्हणाव्या लागतील. अमेरिका- भारत संबंध ज्या उंचीवर आहे, त्याचे ते प्रतीकात्मक रूप आहे. ‘द ऑर्केस्ट्रा हॅव सफिशिअंटली ट्युंड देअर इन्स्ट्रुमेंटस्, द बॅटन हॅज गिव्हन द सिग्नल’ (वाद्यवृंदातील सारी वाद्ये पुरेशा प्रमाणात सुरात लावून सज्ज झाली आहेत. ती सुरू करण्याची खूणही केली गेलेली आहे.) या ओळीत मोदी यांनी ‘देअर इज अ न्यू सिम्फनी इन प्ले’ या स्वत:च्या ओळीची भर टाकून या संबंधांचे अनोखे महत्त्व अधोरेखित केले. यातूनच उभय देशांच्या मैत्रीच्या अध्यायाचे नवे पर्व सुरू होत आहे.

आक्रमक चीनला अटकाव
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अफगाणिस्तान, कतार, स्वित्झर्लंड, अमेरिका आणि मेक्सिको या पाच देशांचा दौरा हा परराष्ट्र धोरणाचा बारकाईने विचार करून अत्यंत सुनियोजित पद्धतीने आखला गेला होता. गेली दोन वर्षे अत्यंत व्यवहार्य पद्धतीने परराष्ट्र धोरणाची रणनीती मोदी यांनी ठरविली आहे. बलाढ्य,युध्दखोर,आक्रमक चीनला अटकाव करण्यासाठी ही मैत्री जरुरी आहे. पाकिस्तानबरोबरची मैत्री दृढ करून तसेच नेपाळ, बांगलादेश, श्रीलंका आदी शेजारी देशांमध्ये हितसंबंधाची गुंतवणूक करून चीन भारताला कोंडीत पकडत आहे. भारताबरोबरचा सीमा प्रश्‍नही त्यांनी अद्याप सोडलेला नाही.अनेक प्रकारे आपल्याला चीन त्रास देत असतो. म्हणुन अमेरिकेची मैत्री लाभदायक आहे.